बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सकाळी वडील आणि दुपारी मुलीचा कोरोनाने केला घात; नेमबाज मोनाली गोऱ्हे अनंतात विलीन

नाशिक | महाराष्ट्रभर सध्या कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून अनेकांना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात जीव गमवावा लागला आहे. वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला असतानाच अनेकांना उपचाराअभावी आपला जीव गमवावा लागत असल्याच्या घटना पाहायला मिळत आहेत. तसेच काहीजण उपचार मिळूनही तब्येतीत सुधारणा होत नसल्याने प्राण सोडताना दिसून येत आहेत.

आज नाशिकमध्ये एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. भारतीय युवा नेमबाज संघाच्या माजी सहाय्यक प्रशिक्षक व श्रीलंकेच्या नेमबाज संघाचे प्रशिक्षक मोनाली गोऱ्हे यांचं कोरोनामुळे दुर्दैवी निधन झालं आहे. काही दिवसांपूर्वी मोनाली गोऱ्हे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता तसेच त्यांच्या बरोबर त्यांच्या वडिलांचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता.

दरम्यान, आज सकाळी मोनाली यांचे वडील यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यानंतर मोनाली यांच्यावरही उपचार सुरू असताना दुपारी त्यांच्या वडिलांपाठोपाठ त्यांचाही कोरोनाने घात केला. या घटनेमुळे क्रीडा क्षेत्रामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळी वडील आणि दुपारी मुलीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने परिसरामध्ये नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे. नाशिक शहरातील एका खासगी रुग्णालयामध्ये दोघांवरही उपचार सुरू होते. त्या दरम्यानच अचानक तब्येत खालावल्याने सकाळी मोनाली गोऱ्हे यांच्या वडिलांचा मृत्यू झाला तर दुपारी मोनाली गोऱ्हे यांनी आपला प्राण गमावला.

थोडक्यात बातम्या

महिला क्रिकेटपटूच्या मदतीला विराट कोहली धावला; केली ‘इतक्या’ लाखांची मदत

मुल होत नाही म्हणून पतीने उचललं अत्यंत धक्कादायक पाऊल!

दिलासादायक! महाराष्ट्रातील ‘या’ शहरात नव्या कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या तिपटीने अधिक

अंधश्रद्धेचा कहर ! कोरोना रोखण्यासाठी 7 लाखांची पुजा, खंडीभर बोकडांचे बळी अन्…

गेले 27 वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत असलेल्या ‘या’ मालिकेच्या नव्या पर्वाचं ट्रेलर प्रदर्शित

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More