बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…याच जिल्ह्यातील दुकानांच्या वेळेत वाढ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय!

सांगली | कोरोना महामारीची दुसरी लाट गेल्या अनेक दिवसांपासून ओसरताना दिसत आहे. त्यामुळे व्यापारी आणि सामान्यांनी निर्बंध शिथिल करत दुकानांच्या वेळेत वाढ करण्याची मागणी लावून धरली आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुकानांच्या वेळा वाढवत मोठा निर्णय घेतला आहे.

आज संध्याकाळपासून दुकाने रात्री 8 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात येत आहे. मात्र जिल्ह्यांमध्ये कोरोना रूग्णांची संख्या कमी आहे त्या जिल्ह्यांमध्येच दुकानांना 8 वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत. ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रूग्णांची आकडेवारी जास्त प्रमाणात आहे त्या जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.

जिथं भेटी दिल्या आहेत आणि जिथं भेटी नाही दिल्या त्या ठिकाणीही सारखीच मदत मिळणार आहे, मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी बोलताना त्यांनी मुंबई लोकल आणि वर्क फ्रॉम होमवरही भाष्य केलं. शक्य असेल त्यांनी वर्क फ्रॉम होम करायला लावा. उद्योगांनी शक्य असेल तिथं बायो बबल करणे आणि आरोग्याचे नियम पाळत सुरक्षितरित्या उत्पादन कशाप्रकारे करता येईल याचा विचार करावा, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, मुंबई लोकलबाबत अद्याप निर्णय घेता येणार नाही. कोरोनाची तिसरी लाट येणार असून केंद्रानेही तशाप्रकारचे आदेश दिल्याचं ठाकरे म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

‘मनसेसोबत युतीसाठी केंद्राची परवानगी घ्यावी लागणार”

लग्नात नवरीने केली धमाकेदार एंट्री, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

“राज ठाकरे हे मला आवडणारं राजकीय व्यक्तिमत्त्व, लवकरच राज ठाकरेंची भेट घेणार”

‘ना सरकारी नोकरी, ना पासपोर्ट’; दगडफेक करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी सरकारने उचललं मोठं पाऊल

कोरोनाची तिसरी लाट कधी येणार?; विजय वडेट्टीवारांनी दिली महत्वाची माहिती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More