बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्यात लुटमारीसाठी दुकानदारावर गोळीबार; पोलिसांनी रचला सापळा आणि…

पुणे | पुण्यात लूटमार करण्यासाठी दुकानदारावर गोळीबार करणाऱ्या एका आरोपीला भारती विद्यापीठ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 14 फेब्रुवारीला दत्तनगरमध्ये विशाल प्रल्हाद पंजाबी या किराणा दुकानदारावर लुटमार करण्याच्या हेतूने चार ते पाच जणांनी गोळीबार केला. यात विशाल गंभीर जखमी झाला.

पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात या गोळीबाराच्या घटनेबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात अशोक गोविंदराव गवई या 55 वर्षीय आरोपीला अटक केली आहे. तसेच या गुन्ह्याचा मुख्य आरोपी व साथीदार अजूनही फरार आहेत.

विशाल पंजाबी यांचं दत्तनगर भागात किराणा दुकान आहे 14 फेब्रुवारीला दुकान बंद करून बाहेर थांबले असताना त्यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी लुटमारीच्या उद्देशाने गोळीबार केला त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केल्याने त्यांचा जीव वाचला. या प्रकरणाचा तपास भारती विद्यापीठ पोलीस करत असताना पोलिसांना आरोपी अशोक गवई हा आंबेगाव परिसरात येणार असल्याची त्यांच्या सूत्रांकडून माहिती मिळाली.

भारती विद्यापीठ पोलिसांनी सापळा रचून आरोपी अशोक गवळी याला अटक केली. तसेच अटकेनंतर आरोपीने केलेल्या गुन्ह्याची कबुली देत लुटमार करण्याच्या हेतूनेच आपण गोळीबार केला असल्याची माहिती पोलिसांना दिली. या प्रकरणातील आरोपी रामधन विश्वकर्मा, राजा सिंह उर्फ राजकुमार आणि सुरज कुमार हे मूळ उत्तर प्रदेशचे असल्याचं कळतंय तसेच हे सर्व आरोपी अजूनही फरार आहेत आणि पुणे पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहे.

थोडक्यात बातम्या –

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिल्याच चेंडूवर गगनचुंबी षटकार ठोकत सुर्यकुमारने रचला इतिहास, पाहा व्हिडीओ

जाणुन घ्या… पुण्यातील कोरोनाबाधितांची आजची धक्कादायक आकडेवारी!

फक्त याच नाही, मागच्या सरकारने देखील अन्यायच केला- ज्येष्ठ IPS अधिकारी संजय पांडे

…अन् प्रवाशांनी खचाखच भरलेली रेल्वे जेव्हा उलटी धावायला लागते, पाहा व्हिडिओ 

फाटलेली जीन्स युवा सांभाळतील पण फाटलेल्या अर्थव्यवस्थेचं काय?- उर्मिला मातोंडकर

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More