बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारतात लसींचा तुटवडा; दुसरीकडे ‘या’ देशात लोकसंख्येच्या 5 पट लसींचा साठा

नवी दिल्ली | देशावर कोरोनाच मोठं संकट घोंगावत आहे. त्यात कोरोना लसींचा तुटवडा मोठ्या प्रमाणात भारतात जाणवत आहे. या प्रकरणी केंद्र सरकारला सगळ्यांनीच धारेवर धरलेलं आहे. मात्र, याउलट स्थिती काही देशांमध्ये दिसत आहे. आर्थिकदृष्ट्या प्रबळ देशांनी आपल्या देशाच्या लोकसंख्येच्या पाचपट कोरोना लसींचा साठा करून ठेवला आहे. या प्रकरणी जागतिक आरोग्य संघटनेनं देखील बोट ठेवलेलं आहे.

आपल्या लोकसंख्येपेक्षा जास्त पटीनं लसींचा साठा करणाऱ्या देशात कॅनडाचा प्रथम क्रमांक लागतो. त्यानंतर, युरोपियन संघ, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, अमेरिका या देशांचा समावेश होतो. तर, ड्यूक ग्लोबल हेल्थ इनोव्हेशन सेंटरच्या आकडेवारीनुसार कॅनडानं सद्यस्थितीला तब्बल 33 कोटी 80 लाख कोरोना लसींची खरेदी केली आहे, जी तिथल्या लोकसंख्येच्या 5 पट आहे. कॅनडामधल्या प्रत्येक नागरीकाला दोन डोस दिल्यानंतरही कोट्यवधी कोरोना लसीचा साठा शिल्लक राहतो. तर, इंग्लंडमध्ये 3.6 पट लसींचा साठा उपलब्ध आहे. युरोपीयन संघानं त्यांच्या लोकसंख्येच्या 2.7 पट कोरोना लस मागवल्या आहेत. ऑस्ट्रेलियाकडे लोकसंख्येच्या 2.5 पट लस शिल्लक आहेत. तर, अमेरीकेकडं लोकसंख्येच्या दुप्पट लसींचा साठा आहे.

सध्या भारताकडं लोकसंख्येच्या केवळ 4 टक्के लसींचा साठा उपलब्ध आहे. मात्र, दुसरीकडं इंडोनेशियाकडे लोकसंख्येच्या 38 टक्के, ब्राझीलकडे 55 टक्के, अफ्रिकन संघाकडं 38 टक्के कोरोना लसी आहेत. तसेच, सौदी अरबयाकडे ‘भारताच्या लोकसंख्येच्या 4 टक्के’ लस आहेत तर, ‘भारताकडे लोकसंख्येच्या 4 टक्के’ लसींचा साठा आहे.

दरम्यान, जागतीक आरोग्य संघटनेनं या साठेबाजीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तर, ज्या देशांकडे पुरेसा साठा उपलब्ध नाही त्या देशातील नागरीकांच्या लसीकरणाबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्याचबरोबर WHO ने आर्थिक दृष्टया सबळ देशांना आवाहन केलं आहे की, आवश्यकतेपेक्षा जास्त लसींचा साठा असल्यास गरीब देशांना त्या लसींचा पुरवठा करावा. या आवाहनाला फ्रान्स आणि बेल्जियम वगळता इतर कोणत्याही देशानं सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही.

थोडक्यात बातम्या

युनिव्हर्सल बाॅस ‘ख्रिस गेल’ने समुद्रात मारल्या पुश-अप, व्हिडीओ तुफान व्हायरल; पाहा व्हिडीओ

दिलासादायक! महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांसह मृतांच्या संख्येतही घट, जाणुन घ्या आकडेवारी

भाजपच्या उत्तर प्रदेशातील ‘या’ तिसऱ्या मंत्र्याचं कोरोनाने दुर्दैवी निधन

“रडू नको बाळा आम्ही आहे ना इथं”, खचलेल्या तरुणाला निलेश लंके यांचा धीर

“मी छोटा राजनची पुतणी आहे, जीव प्यारा असेल तर 50 लाख रुपये दे”; पुणे पोलिसांची ‘ही’ कारवाई

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More