कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लावण्याबद्दल WHOचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
नवी दिल्ली | कोरोना विषाणूच्या महामारीनं गेल्या दोन वर्षापासून थैैमान घातलं आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग आणि वाढती रुग्णसंख्या पाहता जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अशातच निर्बंधही कडक करण्यात आले आहेत.
कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता देशात लाॅकडाऊन होणार का? असा प्रश्न पडला आहे. भारताने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन लावायला हवं की नाही, यावर जागतिक आरोग्य संघटनेनं महत्त्वाची माहिती दिली आहे.
भारतासारख्या देशात, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण लॉकडाऊन लावणे आणि प्रवासावर बंदी घालणे हानी पोहोचवू शकतात. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जीवन आणि रोजगार दोन्ही वाचवणे आवश्यक असल्याचं मत, डब्ल्यूएचओचे भारतातील प्रतिनिधी, रॉड्रिको एच. ऑफ्रिन यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, पूर्ण लॉकडाउन लादण्याचा फायदा कमी आणि तोटा जास्त आहे, कारण संसर्ग रोखण्यासाठी लादलेल्या निर्बंधांमुळे खूप आर्थिक नुकसान होते, असंही आफ्रिन यांनी म्हटलं.
थोडक्यात बातम्या –
पुढील 2 दिवस ‘या’ भागात मुसळधार पावसासह गारपीट होण्याची शक्यता
Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, वाचा आजचे ताजे दर
अभिनेता विकी कौशलचा 13 वर्षापूर्वीचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, अभिनेत्याला ओळखणंही झालं कठीण
Pushpa: अभिनेता अल्लू अर्जुन स्वतःच्याच आवाजाच्या प्रेमात, म्हणाला…
Gold Price: सोनं-चांदी खरेदी करण्याआधी इथे तपासा लेटेस्ट भाव एका क्लिकवर
Comments are closed.