आता सरकारने राम मंदिरासाठी कायदा करावा- आरएसएस

आता सरकारने राम मंदिरासाठी कायदा करावा- आरएसएस

नागपूर | भाजपने प्राप्त केलेल्या यशाबद्दल त्यांचं अभिनंदन. मात्र त्यांनी आता राम मंदिर उभारण्यासाठी कायदा करावा, असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांनी केलं आहे.

राम मंदिराचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे. हा मुद्दा न्यायालयाने बाजूला ठेवला तर सरकारने कायदा करुन राम मंदिर बांधावे, असं ते म्हणाले आहेत.

राम मंदिर हा राजकारणाचा नाही तर लोकांच्या श्रद्धेचा विषय आहे. त्यामुळे सरकारने याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा, असं वैद्य म्हणाले.

देशात प्रबळ विरोधी पक्ष असणे आवश्यक आहे. काँग्रेसने घराणेशाहीवर अवलंबून न राहता संघटना बळकट करण्यासाठी कार्य करावे, असा सल्लाही वैद्य यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या

-विरोधकांनी अंगावर राख फासून आत्मचिंतनासाठी हिमालयात जावं- शिवसेना

-…तर मराठा समाज वंचित बहुजन आघाडीसोबत जाईल- हर्षवर्धन जाधव

-किल्ले शिवनेरीवर माझ्या स्वप्नातील शिवजन्मोत्सव साजरा करणार- अमोल कोल्हे

-सुप्रिया सुळेंच्या विजयाचे लाडू कार्यकर्त्यांनी दिले चंद्रकांत पाटलांना भेट

-मोदींच्या सत्तेत येण्याने भारतात हिंदू राष्ट्रवादाचं पुनरागमन झालंय; विदेशी मीडियाचं विश्लेषण

 

Google+ Linkedin