बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चारचाकीत एकटे असताना मास्क घालावं की नाही?, दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली | देशभरात सध्या कोरोनाची दुसरी लाट आली असल्याचं पाहायला मिळत आहे. देशातील कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच गंभीर बनत चालली आहे. त्यातच मास्क घालने, सॅनीटायझर वापरणे अशा गोष्टींचं सरकारकडून वारंवार आवाहन केलं जात आहे. पण आपण कारमधून जर प्रवास करत असाल तर तिथे मास्क घालणं बंधनकारक आहे का? या संदर्भातील एका याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे.

जर आपण एकट्याने कारमध्ये प्रवास करत असाल तर मास्क घालणं बंधनकारक आहे का? यासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करत असताना न्यायालयाने असं म्हटलं आहे की, कोरोना संक्रमण थांबवण्यासाठी मास्क हा सुरक्षारक्षक म्हणून काम करतो.

कारमध्ये एकट्याने प्रवास करत असतानाही मास्क वापरणं बंधनकारक असल्याचं दिल्ली उच्च न्यायालयाने सुनावणी करताना म्हटलं आहे.  मास्कमुळे आपण आपल्याबरोबरच समोरच्या व्यक्तीचाही कोरोना संक्रमणापासून बचाव करू शकतो. त्यामुळे कारमध्ये मास्क वापरणं गरजेचं असल्याचं न्यायालयाने आपल्या निर्णयात नमूद केलं.

दिल्ली उच्च न्यायालयाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. सोशल मीडियावर काही लोकांनी या निर्णयाचं स्वागत केलं तर काहींनी या निर्णयाचा निषेध नोंदवत न्यायालयाच्या निर्णयाची खिल्ली उडवली. पण उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटलं आहे की, मास्कमुळे लाखो लोकांचे जीव वाचले, त्यामुळे मास्क हा अत्यंत उपयुक्त असून तो नेहमीच वापरला पाहिजे. तसेच कार हे एक सार्वजनिक ठिकाण असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

थोडक्यात बातम्या

कोविशिल्डचा दुसरा डोस घेताना ‘इतक्या’ दिवसांचं अंतर ठेवा, स्वत: पुनावालांनी सांगितलं कारण…

नवरी मंडपात पोहोचली अन् सासूला समजलं ही तर आपलीच बेपत्ता झालेली मुलगी!

हो, मी लग्नाआधीच प्रेग्नंट होते पण…- दिया मिर्झा

‘या’ शहरात दिसलं काळजात धडकी भरवणारं चित्र; एकाच सरणावर 8 जणांचा अंत्यविधी

“…म्हणून मुंबई इंडियन्सने पुन्हा यावर्षीही आयपीएल जिंकावी”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More