पालकमंत्री दाखवा अन् हजार रुपये मिळवा; बुलडाण्यातील अजब प्रकार

बुलडाणा | पालकमंत्री मदन येरावार दाखवा अाणि एक हजार रुपये मिळवा, असं आवाहन स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेनं केलं आहे. स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेचे राणा चंद्रशेखर चंदन यांनी हे आवाहन केलंय.

बुलडाण्याचे पालकमंत्री होऊन 7 महिने झाले तरी मदन येरावार अजून एकदाही जिल्हयात फिरकले नाहीत. बुलडाण्यात दुष्काळ असूनही त्यांनी एकही बैठक घेतली नाही, असं राणा चंद्रशेखर चंदन यांनी म्हटलं आहे.

पांडुरंग फुंडकर यांच्या निधनानंतर मदन येरावर हे बुलडाण्याचे पालकमंत्री झाले.

दरम्यान, पालकमंत्री मदन येरावार दाखवा अाणि एक हजार रुपये मिळवा, असं आवाहन केल्यानं जिल्ह्यात राजकीय चर्चांना ऊत आला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-आता मी बघतो किती लोक वाचतात; नरेंद्र मोदींचा गांधी परिवाराला इशारा

-‘लोग कहते है मैं शराबी हूं’ गाण्यावर भाजप आमदाराचा बेधुंद डान्स

-…मग अमित शहांनी देवेंद्र फडणवीसांकडून सल्ला घ्यायला पाहिजे होता!

-मराठा आरक्षणावर लगेचच सुनावणी घेण्यास कोर्टाचा नकार

-अभिनेत्री माधुरी दीक्षितला पुण्यातून मिळणार लोकसभेची उमेदवारी?

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या