Top News कोल्हापूर महाराष्ट्र

“संयम, शिस्त दाखवली हल्लाबोल कुठे आणि कधी करायचा हे देखील आम्हाला माहीत आहे”

कोल्हापूर | दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यभर आत्मक्लेश जागर आंदोलन केलं आहे. कोल्हापूरात रात्री आठच्या सुमारास झालेल्या आंदोलनात स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी सहभागी झाले होते.

रात्रभर आत्मक्लेष जागरण गोंधळ आंदोलन करुन आम्ही संयम आणि शिस्त दाखवून दिली. हल्लाबोल कुठे आणि कधी करायचा हे देखील आम्हाला माहीत असल्याचा गर्भित इशारा स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे.

रात्रभराच्या जागरणानंतरही कार्यकर्त्यांचा उत्साह पहाटे देखील तसाच कायम होता. या आंदोलनाच्या माध्यमातून नेहमी आक्रमक आंदोलन करणाऱ्या स्वाभिमानीने संयमाचेही दर्शन घडवलं. पहाटे स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी कार्यकर्त्यांना शपथ घेऊन या आंदोलनाची सांगता करत असताना ते बोलतं होते.

शेतकऱ्यांच्या तीव्र भावना राज्य सरकारने केंद्रापर्यंत पोहोचवाव्यात, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे. तसेच शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुरस्कार वापसीच सत्र सुरु झालं आहे. महाराष्ट्रातील पुरस्कार विजेत्यांनी याचा बोध घेत आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत हे केंद्र सरकारला दाखवून द्यावं’, असं आवाहनही राजू शेट्टी यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

“हे यश म्हणजे मतदारांनी महाविकास आघाडीच्या कामाला दिलेली पोचपावती”

‘हिंमत असेल तर एकएकटे लढा’; सत्ताधाऱ्यांना आव्हान देणाऱ्या पाटलांच्या वक्तव्यावर पवार म्हणाले…

‘चंद्रकांतदादांमुळे माझा विजय सोपा’; विजयी उमेदवार अरूण लाड यांचा टोला

आता सर्वसामान्य लोकांनीही महाविकासआघाडी सरकारला स्वीकारलं आहे- शरद पवार

‘आत्महत्या करणारे शेतकरी भेकड’; कर्नाटकच्या कृषीमंत्र्यांचं संतापजनक वक्तव्य

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या