नाशिक | झी मराठी वाहिनीवरील प्रसिद्ध ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतील छत्रपती संभाजी महाराजांना कैद केल्यानंतरचे भाग वगळावे, अशी मागणी शिवसेनेचे नेते आणि माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केली होती. यावर मालिकेतील राणू अक्काची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री आश्विनी महांगडे यांनी खोतकरांना प्रत्युत्तर दिलं आहे.
खोतकरांविषयी मला आदर आहे. पण आत्ताच्या पिढीला आणि लहान मुलांना छ. संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी किती यातना सोसल्या आहेत त्यांना कळायला हवं. इतिहासातील लेखणानुसार कुठेही रक्त दाखवलं जाणार नसल्याचं आश्विनी महांगडे यांनी सांगितलं आहे.
नाशिक महापालिकेच्या पुष्पप्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी त्या आल्या होत्या. यावेळी येताना आश्विनी महांगडे राणू अक्काच्या वेशात आल्या होत्या. नाशिककरांनीही त्याचं जोरदार स्वागत केलं.
दरम्यान, मालिकेत काय दाखवायचं आणि काय नाही याबाबत निर्माते नाही तर झी वाहिनी निर्णय घेते, असं मालिकेतील संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे अमोल कोल्हेंनी सांगितलं आहे.
ट्रेंडिंग बातम्या
“ट्रम्पच्या बाजुला सनी लिओनी उभी राहिली तर 1 कोटी लोक नक्की जमा होतील”
केवळ शिवसेनेने नाही तर काँग्रेसनेही CAA समजून घ्यावा; काँग्रेस खासदाराचा घरचा आहेर
महत्वाच्या बातम्या-
संघाच्या अंगणात जाऊन चंद्रशेखर आझाद यांचं संघप्रमुखांना ओपन चॅलेंज
कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर ‘ते’ वक्तव्य मागे घेतो- वारिस पठाण
महाविकास आघाडी म्हणजे दगडापेक्षा विट मऊ- राजू शेट्टी
Comments are closed.