विराट कोहली तू हे करुन दाखव; रावळपिंडी एक्स्प्रेस शोएब अख्तरचं चॅलेंज

मुंबई | विंडीज विरूद्ध भारत वनडे सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहली अनेक विक्रमांना गवसणी घालत आहे. त्यामुळे त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.

रावळपिंडी एक्सप्रेस म्हणजे पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरनं विराटचं कौतुक केलं आहे. त्यासोबतच शोएबनं विराटला एक विराट आव्हान दिलं आहे.

विराट कोहली हे अजब रसायन आहे. त्याने वन डेत गुवाहाटी, विशाखापट्टणम, पुणे येथे सलग तीन शतकं झळकावली. त्याचे खूप खूप अभिनंदन. तू असाच खेळत राहा. मी तुला 120 शतकांचे लक्ष्य देतो, असं ट्वीट शोएबनं केलं आहे. 

दरम्यान, शोएबनं दिलेल्या या अाव्हानावर विराट काय प्रतिक्रिया देतो? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

-फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनमध्ये मेगा भरती; 1 लाख 20 हजार नोकऱ्या?

-खंडणीसाठी स्टिंग ऑपरेशन; टीव्ही चॅनेलच्या संपादकाला अटक

-रामजन्मभूमीचं ठिकाण अटळ; ती जागा कोणीच बदलू शकत नाही!

-180 जणांना घेऊन जाणारं प्रवासी विमान समुद्रात कोसळलं

-उद्धव ठाकरे लवकरच विराट कोहलीचा रेकॉर्ड तोडतील!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या