Top News

“भाजप नेत्यांनो माझ्या तब्येतीची काळजी करू नका”, शरद पवार माढा लोकसभा लढणार?

सांगोला |  माझं वय झालं म्हणून मी माढा लोकसभा लढू नये, असं म्हणणाऱ्या भाजप नेत्यांनी माझ्या तब्येतीची काळजी करू नये, असा पलटवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर केला आहे.

पवार साहेबांचं वय झालं आहे, त्यामुळे त्यांनी माढा लोकसभा लढू नये, असा खोचक सल्ला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल शरद पवारांना दिला होता.

माढा लोकसभा लढायची की नाही याचा निर्णय मी दोन दिवसांत जाहीर करेन, असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, दिल्लीतील राजकीय वातावरण पाहाता पवार साहेबांना पंतप्रधान बनण्याची संधी आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

पुण्यातून भाजपनं पक्क ठरवलं ‘एकला चलो रे’? पुण्याच्या सभेत युतीबाबत एक शब्द नाही!

दिल्लीतील परिस्थिती पाहता पवारांना पंतप्रधान बनण्याची संधी- मोहिते पाटील

-खरंच देवेंद्र फडणवीस बारामतीत पवारांना आणि शिरूरमध्ये आढळरावांना चारी मुंड्या चित करणार?

अखेर पुणतांब्यांतील बळीराजाच्या पोरींचं अन्नत्याग आंदोलन मागे

-“सर्जिकल स्ट्राईक करुन आम्ही पाकिस्तानला त्यांची जागा दाखवून दिली”

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या