मनोरंजन

श्रद्धाने त्याच्यासाठी मराठीतून पोस्ट केली अन् म्हणाली ‘आय लव्ह यू’!

मुंबई | अभिनेत्री श्रद्धा कपूर तिच्या सिनेमांव्यतिरिक्त तिच्या नम्र आणि उदार स्वभावासाठी ओळखली जाते.  श्रद्धा तिच्या सोबत काम करणाऱ्यांसोबतचे फोटोसुद्धा तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करत असते. नुकताच श्रद्धाचा बॉडीगार्ड अतुल कांबळे याचा वाढदिवस झाला. मग काय श्रद्धांनं अतुलला एक खास सरप्राइज दिलं. तिनं चक्क अतुलसाठी मराठीमधून पोस्ट लिहली आणि आय लव्ह यू, असंही श्रद्धाने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

माझ्या आयुष्यातील महत्वाच्या आणि अप्रतिम माणसाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मला नेहमी सुरक्षित ठेवल्याबद्दल धन्यवाद. अतुल, तुझ्या सारखा व्यक्ती माझ्या आयुष्यात असणं याला मी माझं भाग्य मानते. तुला सुख, शांती आणि तुला जे हवं ते सर्व काही लाभो! आय लव्ह यू. हैप्पी बर्थडे!!!, असं तिने अतुलसाठी केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

श्रद्धा कपूरनं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अतुलसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. यासोबतच तिनं अतुलसाठी मराठीमधून पोस्ट लिहित शुभेच्छा दिल्या. याशिवाय तिनं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ सुद्धा शेअर केला आहे. ज्यात ती अतुलसोबत केक कापताना दिसत आहे.

दरम्यान, श्रद्धा शूटिंग दरम्यानंही ती तिथं असणाऱ्या क्रू मेंबरसोबत मस्ती करताना दिसते. याशिवय तिला प्राण्यांबद्दलही विशेष प्रेम आहे.

 

महत्वाच्या बातम्या- 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या