बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

श्रद्धा कपुरने मारले प्रियांकच्या लग्नात ठुमके, पाहा व्हिडीओ!

मुंबई | बाॅलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपुरची मावशी पद्मिनी कोल्हापुरेचा मुलगा प्रियांक आणि चित्रपट निर्माता करीन मोरानी यांची मुलगी शजा मोरानी या दोघांनी फेब्रुवारीमध्ये कोर्ट मॅरेज केली आहे. मात्र आता नातेवाईक आणि जवळच्या लोकांसोबत त्या दोघांनी त्यांचा विवाह सोहळा मालदिवमध्ये पार पाडला आहे.

श्रद्धाचा चुलत भाऊ प्रियांकच्या लग्नात श्रद्धाने मालदिवमध्ये तीची उपस्थिती लावली होती. यादरम्यान तीने मारलेल्या ठुमक्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड धुमाकुळ घालत आहे. या व्हिडीओमध्ये तीने गुलाबी आणि निळा रंगाचा ल्हेंगा परिधान केला आहे.

याआधी श्रद्धाने एक स्लो मोशनमध्ये व्हिडीओ शेअर केला होता. त्यामध्ये तीने निळा रंगाचा ल्हेंगा घातला असून तो व्हिडीओ तीने समुद्र किनाऱ्यावर शूट केला होता. हा व्हिडीओ 1 तासात 6 लाख पेक्षा जास्त लोकांनी पाहिला होता. त्यावर चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केला.

दरम्यान, 2020 मध्ये श्रद्धाचा ‘बाघी 3’ रिलीज झाला होता. हा चित्रपट अहमद खान यांनी दिग्दर्शित केला असून यात श्रद्धाने टायगर श्रौफसोबत काम केलं आहे. श्रद्धा आता लवकरच ‘लव रंजन’ या चित्रपटात रणबीर कपूरसोबत दिसणार असल्याचं बोललं जात आहे.

 

थोडक्यात बातम्या-

भारताने इंग्लंडला पाणी पाजत वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनयशीपच्या अंतिम सामन्यात मारली धडक

“असंच चालत राहिल्यास नोटेवरुन गांधीचा फोटो हटवून मोदी स्वत:चाच फोटो छापतील”

…म्हणून मी स्टंपच्या मागे मोठ्याने बडबड करतो, पंतने केला खुलासा, पाहा व्हिडीओ

‘तू काय ज्येष्ठ नागरिक आहेस का?’; कोरोनाची लस घेतल्यावर सैफ होतोय ट्रोल!

‘कुणाला लिव्ह ईन रिलेशनमध्ये मुलं होतात तर कुणाला…’; चंद्रकांत पाटलांचा सरकारवर निशाणा

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More