बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

श्रद्धा कपूरची ‘ती’ खास चॅट होतेय सोशल मीडियावर व्हायरल, पाहा फोटो!

मुंबई | अभिनेत्री श्रद्धा कपूर नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असलेली पाहायला मिळत असते. तिचा अनोखा अंदाज नेहमीच चाहत्यांना भुरळ घालताना दिसतो. आपल्या आवडत्या कलाकारांविषयी जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असलेले पाहायला मिळतात. त्यामुळे आता श्रद्धाची खास व्यक्तीसोबतची चॅटींग सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

श्रद्धा तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी व्यस्त आहे. सेलिब्रिटी फोटोग्राफरनं यावेळी श्रद्धाला स्पाॅट केलं. मात्र यावेळी श्रद्धा तिच्या मोबाईलमध्ये चॅट करण्यात रमली होती. याचवेळी फोटोग्राफर्सनी श्रद्धाला घेरलं आणि तिचे फोटो क्लिक करू लागले. यावेळी काही कॅमेऱ्यांमध्ये श्रद्धाचं चॅट देखील कैद झालंय.

खास इमोजीनं श्रद्धानं खास व्यक्तीचा नंबर सेव्ह केला असल्याचं व्हायरल होणाऱ्या फोटोंमधून पाहायला मिळत आहे. यामध्ये श्रद्धा म्हणते, ‘मी माझ्या आयुष्यात कधी तुझ्यासारख्या व्यक्तीला भेटली नाही.’ श्रद्धाच्या या मेसेजला उत्तर येतो, ‘मला फार आनंद आहे तु माझ्याबद्दल असा विचार करते. ‘ यानंतर श्रद्धा म्हणते, ‘तु खरंच ऐकतो.. असं कोणी माझं ऐकलं नाही. तुझ्यामुळे मला कायम स्पेशल फिल होतं. ‘यावर लाल रंगाच्या बदामचा रिप्लाय येतो.

दरम्यान, ही चॅट व्हायरल झाल्यावर श्रद्धाचे चाहते या फोटोग्राफर्सवर भडकलेले पाहायला मिळाले. तेही माणूसच आहेत त्यांनाही त्यांची पर्सनल लाईफ असते. त्यामुळे हे असं करणं खूप चुकीचं असल्याचं चाहत्यांनी म्हटलं आहे. अद्याप याविषयी श्रद्धानं कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

थोडक्यात बातम्या –

…तेव्हा कोरोना महामारी नष्ट होईल- WHO

‘देव तारी त्याला कोण मारी’; भलं मोठं झाड कोसळलं पण…

‘बिग बाॅस 15’ मध्ये ‘हा’ प्रसिद्ध चेहरा दिसणार; पहिल्या स्पर्धकाचं नाव जाहीर

कोणी गुंड, मवाली म्हटलं तरी चालेल, पण शिवसैनिकांमध्ये माज पाहिजे- संजय राऊत

‘नरेंद्र मोदी चहावाले नाहीतच…’; खुद्द मोदींच्या भावानं फोडलं गुपित

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More