Shraddha Walkar Case | आफताब पूनावालाच्या नव्या गर्लफ्रेंडचा मोठा खुलासा!
नवी दिल्ली | श्रद्धा वालकर (Shraddha Walkar) प्रकरणाचं गूढ अजूनही कायम आहे. दिवसेंदिवस या हत्याकांड प्रकरणाशी संबंधित नवनवे खुलासे समोर येत आहेत. आता या प्रकरणी नवीन माहिती समोर आली आहे.
आफताब वेगवेगळ्या डेंटिंग अॅपद्वारे अनेक मुलींच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. श्रद्धाची हत्या केल्यानंतर अफताबने त्याच्या फ्लॅटवर त्याच्या मैत्रिणीला आणलं होतं, अशी माहिती समोर आली आहे.
दिल्ली पोलिसांनी आफताबच्या कुंडलीचा तपास सुरू केला असता, आफताब वेगवेगळ्या डेटिंग साइटच्या माध्यमातून सुमारे 15 ते 20 मुलींच्या संपर्कात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
तपासात पोलिसांना बंबल अॅपच्या माध्यमातून 30 मे रोजी श्रद्धाच्या हत्येनंतर 12 दिवसांनी बंबल अॅपद्वारे आफताबच्या संपर्कात आलेल्या एका मुलीची माहिती मिळाली.
ही मुलगी पेशाने मानसोपचारतज्ज्ञ आहे, हत्येनंतर ही मुलगी आफताबच्या संपर्कात असल्याचं पोलिसांना समजलं, त्यानंतर पोलिसांनी तिची चौकशी केली.
आफताबच्या या मैत्रिणीने सांगितलं की तिला आफताबचा स्वभाव अगदी सामान्य आणि खूप काळजी घेणारा वाटला. आफताबकडे विविध प्रकारचे डिओडोरंट्स आणि परफ्यूम्सचा संग्रह होता आणि तो अनेकदा या मित्राला परफ्यूम भेट देत होता.
आफताब खूप धूम्रपान करायचा. तो सिगारेटही बनवायचा, पण अनेकदा सिगारेट लवकर सोडून देण्याबद्दल बोलायचा आणि खूप आनंदी असायचा, असंही मैत्रिणीने सांगितलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
Comments are closed.