नवी दिल्ली | श्रद्धा वालकर(Shraddha Walkar) प्रकरणानं सगळ्या देशाला हादरवून टाकलं आहे. दिवसेंदिवस नवनवीन खुलासे समोर येत आहेत. याच प्रकरणी एक नवी माहिती समोर आली आहे. पोलिसांनी आफताब विरोधात चार्जशीट दाखल केली आहे. यावेळी एक नवीन खुलासा करण्यात आला आहे.
चौकशीदरम्यान, आफताबने श्रद्धाची हाडे मिक्सर ग्राइंडरमध्ये (Mixer Grinder) काढून त्याची पावडर बनवल्याचं सांगितलं होतं. ही गोष्ट त्याने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी सांगितल्याचं चार्टशीटमध्ये (Chartsheet) नमूद केलं आहे. त्या रात्री श्रद्धाच्या हत्येनंतर आफताबने ऑनलाईन काही गोष्टी मागवल्या होत्या.
श्रद्धाच्या बाॅडीची विल्हेवाट लावण्यासाठी आफताबने ऑनलाइन 20 लिटर पाण्याच्या 16 बाटल्या ऑर्डर केल्या होत्या. याचा पाण्याचा उपयोग तो श्रद्धाच्या बाॅडीची विल्हेवाट लावण्यासाठी करणार होता. त्याशिवाय 19,20 आणि 21 मेला देखील या बाॅटलस् मागवण्यात आल्या होत्या. याशिवाय आफताबने 11 किलो बर्फदेखील (Ice) मागवला होता. श्रद्धच्या बाॅडीचा वास येऊ नये आणि त्या बर्फाच्या लादीत तिला ठेवता यावं यासाठी आफताबने बर्फ मागवला होता.
श्रद्धेच्या हत्येदिवशी दुपारी दोन लोकांसाठी अन्न ऑर्डर करण्यात आलं होतं. त्याच रात्री मात्र एकच चिकन रोल ऑर्डल केला होता. दरम्यान, आफताब पुनावाला (Aftab Punawala) यांच्यावर त्याची लिव-इन पार्टनर श्रद्धा वालकर हिचा खून केल्याचा आरोप आहे. हत्या करुन तिच्या शरीराचे 35 तुकडे करण्यात आले. त्यानंतर हे तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी फेकून देत हत्या केल्याचे पुरावे मिटवले होते. सहा महिन्यानंतर हे प्रकरण बाहेर आलं, त्यानंतर आफताबला अटक करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘या’ राज्यात काँग्रेसला मोठा झटका!
- कसबा-चिंचवड पोटनिवडुकीबाबत अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर!
- ठाकरे-आंबेडकर युती फायद्याची की तोट्याची?
- ठाकरे-आंबेडकर युतीबाबत अजित पवार स्पष्टच बोलले; म्हणाले…
- अखेर सत्यजीत तांबे ‘त्या’ कारणामुळं भाजपमध्ये प्रवेश करणार?