आता श्रीपाद छिंदमच्या भावावर देखील गुन्हा दाखल

अहमदनगर | शिवरायांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या श्रीकांत छिंदमच्या भावावर देखील गुन्हा दाखल झाला आहे. त्याने मतदान केंद्रात जाऊन ईव्हीएसची पूजा केली होती. 

श्रीपाद छिंदम हा विजयी व्हावा, यासाठी ही पूजा केली होती. हा प्रकार समजल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी याप्रकरणी अखेर कारवाई केली आहे. 

श्रीकांत छिंदम ईव्हीएमची पूजा करत असताना भाजपच्या उमेदवार अंजली देवकर देखील तिथं उपस्थित होत्या. त्यांनी हा प्रकार का थांबवला नाही यावरही आश्चर्य व्यक्त केलं जातंय. 

दरम्यान, आज नगर महापालिकेचा निकाल आहे. त्यामुळे या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-“दिल्लीत शिवसेना खासदारांचा दरारा, पंतप्रधान मोदीही रस्ता बदलतात”

-कारगिल युध्द होणार आहे, हे आडवाणींना अगोदरचं माहिती होतं

“मागच्या वेळी भाजपसाठी टेबल लावले, आता वाट लावणार”

-“इंग्रजांच्या काळापासून मराठ्यांना आरक्षण,पण काँग्रेसनं ते काढून घेतलं”

“सरकारच्या नाही तर भारतातील 100 कोटी हिंदूंच्या जोरावर राम मंदिर बनेल”