मराठी नेत्यांचे 56 इंची छातीसमोर बोलण्याचे धाडस नाही!

पुणे | मराठी नेत्यांचे आणि मुख्यमंत्र्यांचे 56 इंची छातीसमोर बोलण्याचे धाडस नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, अशा शब्दात माजी संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी आपला राग व्यक्त केलाय. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासंदर्भात ते पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात बोलत होते. 

मोदी सरकारचा मराठीवर अन्याय सुरु असून आपले भांडण आता दिल्लीशी आहे, असं श्रीपाल सबनीस यांनी म्हटलंय. तसेच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी 27 फेब्रुवारीपासून लाक्षणिक उपोषण करण्याची घोषणा त्यांनी केलाय. 

मराठीचा पुळका दाखवणाऱ्या राज आणि उद्धव ठाकरे यांचे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, या प्रश्नावर तोंड बंद का? तेराशे शाळा बंद करणे हा विनोद तावडेंचा वेडेपणा असून हा मराठी भाषेशी केवढा मोठा क्रूर विनोद आहे, असंही ते यावेळी म्हणाले.