Shreyas Talpade l सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारी करत आहेत. या निवडणुकीच्या रणधुमाळीवर अभिनेता श्रेयस तळपदेनं एक वक्तव्य केलं आहे. श्रेयसने पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरु आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेल्या दहा वर्षांपासून देशासाठी काम करतात :
श्रेयस तळपदे आणि ‘पुष्पा’ फेम अभिनेत्री रश्मिका मंदाना यांनी एका मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच कौतुक केलं आहे. यावेळी श्रेयस तळपदे म्हणाला की, गेल्या दहा वर्षांत देशाचा बराच विकास झाल्याचं म्हटलं आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेल्या दहा वर्षांपासून देशासाठी जास्त काम करत आहेत आणि ते देशाचा विचार करत आहेत, म्हणून मोदींवर लोकांचा पूर्ण विश्वास आहे”, असं श्रेयस म्हणाला आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा निवडणूक जिंकणार आहेत आणि पुन्हा ते देशाचे पंतप्रधान होतील असा विश्वास श्रेयसने व्यक्त केला आहे.
तसेच श्रेयस तळपदे म्हणाला की, “सध्याच्या राजकीय परिस्थितीत मी नरेंद्र मोदींचं खूप कौतुक करत असतो. कारण गेल्या दहा वर्षांपासून ते आपल्या देशासाठी प्रचंड काम करत आहेत. ते सर्वात आधी देशाचा विचार करतात. म्हणूनच लोकांचा मोदींवर पूर्णपणे विश्वास आहे. सध्याच्या परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच निवडणूक जिंकतील आणि पुन्हा पंतप्रधानांच्या खुर्चीवर बसतील असा विश्वास मोदींवर दाखवला आहे.
Shreyas Talpade l रश्मिका मंदाना काय म्हणाली? :
रश्मिका मंदानाने एका मुलाखतीत राजकीय गोष्टींवर भाष्य केलं आहे. “दोन तासांचा प्रवास आता अवघ्या वीस मिनिटांतपार होत आहे. हे ऐकून कोणाचाही यावर विश्वास बसणार नाही. पण मात्र हे शक्य होईल, याचा विचार तरी कोणी केला होता का?
आज नवी मुंबई ते मुंबईपर्यंतचा प्रवास तसेच गोवा ते मुंबईपर्यंतचा आणि बेंगळुरू ते मुंबईपर्यंतचा प्रवास खूप सोपा झाला आहे. याचं मला फार कौतुक वाटतं आहे. गेल्या दहा वर्षांत या देशाचा खूप विकास झाला असल्याचं रश्मिका मंदाना म्हणाली आहे.
News Title – Shreyas Talpade Praised Pm Narendra Modi Said He Will Win Again In Lok Sabha Elections 2024
महत्त्वाच्या बातम्या
मौलवी उपचाराच्या नावाखाली करत होता बलात्कार, महिलेचा धक्कादायक दावा
ऐश्वर्या रायचा अपघात, अशा परिस्थितीत दिसल्याने बॅालिवूडमध्ये खळबळ
कमी किमतीत खरेदी करा 6 एअरबॅग असलेल्या आकर्षक कार
राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये वीजेच्या गडगडाटासह पावसाची शक्यता
“मोदीजी आता कांद्यावर बोला”; मोदीजी म्हणतायेत जय श्रीराम