श्री श्री रविशंकर ना संत ना महात्मे, ते फक्त नौटंकीबाज आहेत!

अलाहाबाद | श्री श्री रविशंकर ना संत-महात्मे आहेत… ना अध्यात्मिक गुरु, ते फक्त नौटंकीबाज आहेत, असं महंत नरेंद्र गिरी यांनी म्हटलंय. नरेंद्र गिरी साधू-महंतांची सर्वात मोठी संघटना असलेल्या अखिल भारतीय आखाडा परिषदेचे प्रमुख आहेत. 

श्री श्री रविशंकर यांनी अयोध्येतील राम मंदिराच्या वादात मध्यस्थी करण्याची भूमिका घेतलीय. मात्र आपला व्यवसाय वाढवण्यासाठी रविशंकर यांचे प्रयत्न सुरु आहेत. त्यांच्यामुळे अयोध्येचा वाद सुटण्यापेक्षा वाढू शकतो, असं नरेंद्र गिरी यांनी म्हटलंय. 

दरम्यान, रविशंकर यांच्यावर निशाणा साधल्यामुळे आता राम मंदिर प्रश्नावरुन हिंदू संत-महंतांमध्येच दोन गट पडल्याचं चित्र आहे.