श्रीदेवी अखेर पंचत्वात विलीन, बोनी कपूर यांनी दिला मुखाग्नी

मुंबई | बाॅलीवूडची सुपरस्टार अभिनेत्री श्रीदेवी अखेर पंचतत्वात विलीन झालीय. विलेपार्लेच्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पती बोनी कपूर यांनी दिला मुखाग्नी दिला.

श्रीदेवींचा आवडता रंग पांढरा असल्यामुळे त्यांचा स्वर्गरथ पांढऱ्या फुलांनी सजवण्यात आला होता. साडेचार किलोमीटर लांबीच्या या प्रवासादरम्यान पोलीस आणि एसआरपीएफनं कडेकोट बंदोबस्त केला होता. मात्र चाहत्यांची अलोट गर्दी यावेळी उसळली होती. 

2003 मध्ये श्रीदेवींना पद्मश्री प्रदान करण्यात आला होता, त्यामुळे त्यांना तिरंग्याचा मान देण्यात आला. तसेच मुंबई पोलिसांकडूनही गार्ड ऑफ अॉनर देण्यात आला.