श्रीदेवी यांचे पार्थिव भारतात येणार, मात्र बोनी कपूर दुबईतच अडकणार!

मुंबई | अभिनेत्री श्रीदेवी यांचे पार्थिव लवकरंच त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात येणार आहे, मात्र बोनी कपूर यांना चौकशीसाठी दुबईतच थांबावं लागणार आहे. ‘टाइम्स नाऊ’ वृत्तवाहिनीने या संदर्भात वृत्त दिले आहे.

मृत्युनंतरच्या कायदेशीर कारवाया पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे पुढील चार ते पाच तासांत श्रीदेवी यांचे पार्थिव भारतात आणण्यात येईल अशी शक्यता आहे.

दरम्यान, श्रीदेवी दुबईत ज्या हॉटेलमध्ये थांबल्या होत्या, तेथील कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली असून तेथील सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी पाहिले आहेत. त्याशिवाय श्रीदेवी यांचे पती बोनी कपूर यांचीही चौकशी करण्यात येणार आहे.