मृत्यूपूर्वी नशेत होत्या श्रीदेवी, बाथटबमध्ये बुडून झाला मृत्यू!

मुंबई | बाथटबमध्ये बुडून श्रीदेवी यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. रुग्णालय प्रशासनाने सोपवलेल्या फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये यासंदर्भात खुलासा करण्यात आलाय. 

श्रीदेवी यांच्या रक्तात दारुची मात्रा आढळल्याचा दावा गल्फ न्यूजने केलाय. कार्डीयक अरेस्टनंतर श्रीदेवींना स्वतःला सांभाळता आलं नाही आणि त्या बाथटबमध्ये पडल्या असाव्यात, असा अंदाज आहे. 

दरम्यान, रुग्णालयाकडून श्रीदेवी यांच्यासंदर्भातील सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. मृत्यूचं प्रमाणपत्रही देण्यात आलं आहे. त्यामुळे लवकरच त्यांचं पार्थिव मुंबईला रवाना होईल.