कसा होता श्रीदेवीचा आजवरचा प्रवास? कोणते सिनेमा झाले सुपरहिट???

मुंबई | बाॅलीवूडची हवाहवाई अशी ओळख असलेली अभिनेत्री श्रीदेवी यांच्या अकाली मृत्यूने बाॅलीवूडवर शोककळा पसरलीय. श्रीदेवी यांनी वयाच्या अवघ्या 54 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अनेक भूमिका गाजल्या. नृत्यांगना म्हणूनही त्यांनी चाहत्यांच्या मने जिंकली. 

कसा होता प्रवास?

श्रीदेवीचे पूर्ण नाव श्री अम्मा यंगर अय्यपन होते. त्यांना जन्म 13 ऑगस्ट 1963 साली  झाला. त्यांनी तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्ल्याळम चित्रपटातही अभिनय केला आणि त्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. अनेक प्रकारच्या भूमिका गाजवून त्यांनी सगळ्यांच्याच मनावर ठसा उमटवला.

1967 – बालकलाकार म्हणून वयाच्या चौथ्या वर्षी थुनैवन या तामिळ चित्रपटात काम केलं 

1971 – केरळचा सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा राज्य चित्रपट पुरस्कार वयाच्या आठव्या वर्षी पुम्बाता या मल्ल्याळम चित्रपटासाठी घेतला.

1975 – वयाच्या 12 व्या वर्षी ज्युली या बॉलिवूडपटातून बालकलाकार म्हणून पदार्पण.

1976 – वयाच्या 13 व्या वर्षी मूंद्रू मुदिचू हा तामिळ चित्रपट प्रौढ कलाकार म्हणून पहिला चित्रपट मानला जातो.

1978 – वयाच्या 15 व्या वर्षी ‘सोलवा सावन हा पहिला बॉलिवूडपट

हिंमतवाला चित्रपटातून श्रीदेवी नावाजल्या गेली. जीतेंद्र आणि श्रीदेवी या जोडीनं अख्ख बाॅलीवूड गाजवलं, मकसद, जस्टिस चौधरी असे एकापाठोपाठ एक हिट चित्रपट दिले. सदमा या चित्रपटानंतर श्रीदेवीचे खूप कौतुक झाले. मग चांदनी, लम्हे, मिस्टर इंडिया, खुदा गवाह, नगिना, चालबाज यासारख्या चित्रपटांमधल्या भूमिकांनी हिंदी चित्रपटांच्या दुनियेत त्यांचं एक वेगळं नाव निर्माण झालं. मिस्टर इंडिया या चित्रपटातल्या एका नृत्यानं त्यांना मिस हवाहवाई हे टोपणनाव मिळवून दिलं होतं.

गाजलेले चित्रपट-

1983- सदमा
1983- हिम्मतवाला
1983- जस्टिस चौधरी
1983- मवाली
1983- कलाकार
1984- तोहफा
1986- नगिना
1986- आग और शोला
1986- कर्मा
1986- सुहागन
1987 – औलाद
1987 – मिस्टर इंडिया
1989 – निगाहे (नगिना भाग 2)
1989 – चांदनी
1989 – चालबाज (सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर)
1991 – फरिश्ते
1991 – लम्हे (सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर)
1992 – खुदा गवाह
1992 – हीर रांझा
1993 – रुप की रानी चोरों का राजा
1993 – गुमराह
1993 – चंद्रमुखी
1994 – लाडला
1997 – जुदाई
2004 – सहारा वन चॅनलवर मालिनी अय्यर या दैनंदिन मालिकेतून छोट्या पडद्यावर एन्ट्री

2008 – फॅशन मॉडेल म्हणून पदार्पण. लॅक्मे फॅशन वीक मधून रॅम्पवर पाऊल

2012 – गौरी शिंदे दिग्दर्शित इंग्लिश विंग्लिश चित्रपटातून श्रीदेवींनी बॉलिवूडमध्ये पुनरागमन केलं.

2017 – ‘मॉम’ हा अखेरचा चित्रपट

गेल्याच वर्षी श्रीदेवी यांच्या चित्रपट कारकीर्दीला 50 वर्ष पूर्ण झाली. त्यांनी बाॅलीवूडची ‘मॉम’ म्हणून अखेरचा श्वास घेतला.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा