Nagar 222 - नगरमध्ये अल्पवयीन मुलीला गावगुंडांची मारहाण आणि विनयभंग
- पुणे, महाराष्ट्र

नगरमध्ये अल्पवयीन मुलीला गावगुंडांची मारहाण आणि विनयभंग

नगर | श्रीगोंदा तालुक्यातील पारगावमध्ये अल्पवयीन मुलीला गावगुंडांनी अश्लील शिवीगाळ करुन मारहाण करत तिचा विनयभंग केल्याचा प्रकार घडलाय. सुनील बोनगे असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे.

पीडित कुटुंबाची जमीन हडप करता यावी या उद्देशाने या गावगुंडाने घरी येऊन गोंधळ घातल्याचं कुमार सप्तर्षी यांचं म्हणणं आहे.

दरम्यान, युक्रांदच्या कार्यकर्त्यांनी तक्रार केल्यानंतर तब्बल आठवडाभराने श्रीगोंदा पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला. आरोपी मात्र अद्याप फरार आहेत.

पाहा व्हिडिओ-

या बातमीवर तुमची कमेंट लिहा