Shrikant Shinde | विधानसभेत मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर महायुतीमध्ये मुख्यमंत्री पद कुणाला मिळणार, याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे. अजूनही युतीकडून मुख्यमंत्रीपद कुणाला मिळणार, याची घोषणा झालेली नाही. शिंदे गटाकडून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळावं म्हणून आग्रह केला जातोय. मात्र, एकनाथ शिंदे यांनी काल (27 नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी मुख्यमंत्रिपदासंदर्भातील निर्णय दिल्लीतील भाजपाचे ज्येष्ठ नेते घेतील आणि तो निर्णय आपल्याला मान्य असेल, असं म्हटलं आहे. (Shrikant Shinde)
एकनाथ शिंदे यांनी पदावरील दावा सोडल्यानंतर विविध प्रतिक्रिया उमटल्या. एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनी अगोदर वडील (एकनाथ शिंदे )यांनी मुख्यमंत्री व्हावं, अशी अपेक्षा व्यक्त करणारे ट्वीट केले होते. मात्र, काही वेळातच त्यांनी ते ट्वीट डिलिट केलं. यानंतर श्रीकांत शिंदे यांनी वडिलांच्या कार्यकाळाचं कौतुक करणारे ट्वीट करत नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे आभार मानले. त्यांनी डिलिट केलेल्या ट्वीटचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
श्रीकांत शिंदे यांनी डिलिट केलेलं ट्वीट-
“राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री पदी पुन्हा मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब विराजमान व्हावेत, अशी सर्वसामान्य जनतेची ही भावना आहे.”, असं ट्वीट श्रीकांत शिंदे यांनी केलं होतं. मात्र, नंतर त्यांनी आपलं हे ट्वीट डिलिट केलं. यानंतर श्रीकांत शिंदे यांनी अजून एक ट्वीट केलं, ते खाली दिलं आहे.
श्रीकांत शिंदे यांचं नवं ट्वीट-
मला माझे बाबा आणि आमचे शिवसेना मुख्यनेते मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांचा खूप अभिमान वाटतो. त्यांची महाराष्ट्र आणि येथील जनतेशी असलेली अतूट बांधिलकी अतुलनीय आहे. त्यांनी अहोरात्र अथक परिश्रम केले. समाजातील प्रत्येक घटकाची निस्वार्थ सेवा करून त्यांचे प्रेम, विश्वास आणि प्रशंसा मिळवली. ते स्वतःला ‘सीएम’ म्हणजे ‘कॉमन मॅन’ समजत. त्यांनी सर्वसामान्यांसाठी वर्षा बंगल्याचे दार उघडले आणि जनसेवेत एक नवा इतिहास घडवला. (Shrikant Shinde)
कारकिर्दीच्या शिखरावर असतानाही त्यांची नम्रता आणि कर्तव्यभावना दिसून येते. आज त्यांनी माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी आणि माननीय श्री. अमित शहाजी यांच्यावर विश्वास ठेवून, वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा युती धर्माचे पालन करत एक प्रगल्भ उदाहरण ठेवले आहे.
सत्ता आणि पद अनेकदा सार्वजनिक जीवनावर वर्चस्व गाजवते. भल्याभल्यांना मोहात पाडते, पण शिंदे साहेब अपवाद ठरले. त्यांच्यासाठी जनसेवा आणि राष्ट्रनिर्मिती हे नेहमीच सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे आणि त्यांचा वारसा पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहील. गोर – गरिबांचा आशीर्वाद आणि सदिच्छा हीच शिंदे साहेबांची खरी संपत्ती आहे. खूप अभिमान वाटतो बाबा!, असं नवीन ट्वीट श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी केलं.
मला माझे बाबा आणि आमचे शिवसेना मुख्यनेते मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांचा खूप अभिमान वाटतो. त्यांची महाराष्ट्र आणि येथील जनतेशी असलेली अतूट बांधिलकी अतुलनीय आहे. त्यांनी अहोरात्र अथक परिश्रम केले. समाजातील प्रत्येक घटकाची निस्वार्थ सेवा करून त्यांचे प्रेम, विश्वास आणि प्रशंसा…
— Dr Shrikant Lata Eknath Shinde (@DrSEShinde) November 27, 2024
News Title : Shrikant Shinde deleted tweet viral
महत्वाच्या बातम्या –
मध्यरात्री दिल्लीत खलबतं, ‘या’ बड्या नेत्याने अमित शाहांची भेट घेतल्याने CM पदाचा सस्पेन्स वाढला
राज्यातील ‘या’ भागात थंडीची लाट उसळणार, हवामान विभागाचा महत्वाचा इशारा
“मोदी आणि शाह यांच्यावर विश्वास ठेऊन माझे बाबा..”; श्रीकांत शिंदेंची भावनिक पोस्ट चर्चेत
आज ‘या’ राशींवर स्वामींची असणार अपार कृपा, दुःख दूर होऊन सुखाचे दिवस येणार!
‘डायरेक्टर कट म्हटला तरी तो करतच राहिला….’; अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा