Shrikant Shinde | विधानसभेत मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर महायुतीमध्ये मुख्यमंत्री पद कुणाला मिळणार, याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे. सीएम पदासाठी भाजपकडून देवेंद्र फडणवीस तर शिंदे गटाकडून एकनाथ शिंदे यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, काल (27 नोव्हेंबर) झालेल्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदासंदर्भातील निर्णय दिल्लीतील भाजपाचे ज्येष्ठ नेते घेतील आणि तो निर्णय आपल्याला मान्य असेल असं म्हणत मुख्यमंत्री पदावरील आपला दावा सोडला. (Shrikant Shinde)
एकनाथ शिंदेंनी पदावरील दावा सोडल्यानंतर राजकीय क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत. शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट केली आहे. ‘माझे बाबा’ म्हणत श्रीकांत शिंदे यांनी वडिलांच्या कार्यकाळाचं कौतुक केलं.
श्रीकांत शिंदे यांची पोस्ट जशास तशी-
मला माझे बाबा आणि आमचे शिवसेना मुख्यनेते मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांचा खूप अभिमान वाटतो. त्यांची महाराष्ट्र आणि येथील जनतेशी असलेली अतूट बांधिलकी अतुलनीय आहे. त्यांनी अहोरात्र अथक परिश्रम केले. समाजातील प्रत्येक घटकाची निस्वार्थ सेवा करून त्यांचे प्रेम, विश्वास आणि प्रशंसा…
— Dr Shrikant Lata Eknath Shinde (@DrSEShinde) November 27, 2024
News Title : Shrikant Shinde post on eknath shinde
महत्वाच्या बातम्या –
आज ‘या’ राशींवर स्वामींची असणार अपार कृपा, दुःख दूर होऊन सुखाचे दिवस येणार!
‘डायरेक्टर कट म्हटला तरी तो करतच राहिला….’; अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
‘माझा पक्ष, माझे वडिल….’; पार्थ पवारांचा अमोल मिटकरींना थेट इशारा
एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडला का?
“लोकप्रियता मिळवण्यासाठी मी…”; पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले