“आदित्य ठाकरे वरळीत उभे राहणार की दुसरा मतदारसंघ शोधणार?”

Shrikant Shinde On Aaditya Thackeray

Shrikant Shinde | राज्यात लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने विजय मिळवला. त्यानंतर आता महाविकास आघाडी आणि महायुतीतने पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केलीये. अशातच आता वरळी मतदारसंघ हा चर्चेचा विषय ठरला आहे. वरळी मतदारसंघात मनसेचा उमेदवार निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे. तर ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरे लढतील असं बोललं जात आहे. अशातच आता कल्याण डोंबिवली मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदेंनी (Shrikant Shinde) सवाल करत आदित्य ठाकरेंना डिवचलं आहे.

“आदित्य ठाकरे वरळीत उभे राहतील की दुसरा मतदारसंघ शोधणार?”

आदित्य ठाकरे वरळीत उभे राहतील की दुसरा मतदारसंघ शोधणार?, असा सवाल श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी केला आहे. तेव्हा आदित्य ठाकरेंना त्यांनी डिवचलं आहे. यावेळी बोलत असताना श्रीकांत शिंदेंनी (Shrikant Shinde) महाविकास आघाडीवर आरोप केला. ते म्हणाले की महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत चुकीचा नेरेटिव्ह ठेऊन मतं मिळवली आहेत.

फेक नेरेटिव्ह ठेऊन महाविकास आघाडीने मतं मिळवली आहे. परंतु हे टेम्पररी आहे. मात्र येत्या विधानसभेत महायुतीचंच सरकार येणार असल्याचं श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) म्हणाले आहेत. लोकांमध्ये संविधान खतरे मे असल्याचा प्रचारामुळे गैरसमज निर्माण झालाय. यामुळे मतदान हे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना गेलं आहे. त्यामुळे त्यांचा विजय झाला असला तरीही ते टेम्पररी आहे.

कल्याणमध्ये आचारी अत्रे रंगमंदिरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे खासदार श्रीकांत शिंदे, खासदार सुनील तटकरे यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला सुनील तटकरे काही कारणास्तव येऊ शकले नाहीत. यावेळी राष्ट्रवादी भाजप व शिवसेना कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

श्रीकांत शिंदे म्हणाले की, लोकांना दिशाभूल एकदा करू शकता. वारंवार दिशाभूल होत नसते. येत्या विधानसभेला जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येईल, असं श्रीकांत शिंदे म्हणाले आहेत.

“लोकांनी जागा दाखवून दिली”

यावेळी बोलत असताना त्यांनी आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केला. त्यांना वाटत होतं की वरळी मतदारसंघात 40 हजार मताधिक्य मिळेलं असं त्यांना वाटेल. मात्र लोकांनी त्यांची जागा त्यांना दाखवून दिली आहे. वरळी मतदारसंघात केवळ 6 हजार मताधिक्य दिलं. मात्र त्यांना वाटलं मराठी माणूस त्यांच्या बाजूने आहे. मात्र खऱ्या अर्थाने मराठी माणूस हा धनुष्यबाणाच्या बाजूने आहे, असं श्रीकांत शिंदे म्हणाले आहेत.

News Title – Shrikant Shinde Slam To Aaditya Thackeray Over Worli Vidhansabha

महत्त्वाच्या बातम्या

वडील, चुलता आणि भावाकडून बलात्कार

‘अटल सेतू’ प्रकल्पाबाबत महत्त्वाची अपडेट समोर!

‘या समाजालाही ओबीसातून आरक्षण द्या’; मनोज जरांगेंची मोठी मागणी

मोठी बातमी! पुण्यात एसटी बसचा भीषण अपघात, 30 प्रवासी जखमी

‘आराध्या बच्चन आणि माझं हे नातं…’; अखेर सलमान खानकडून सत्य बाहेर

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .