बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी मला पैशांची ऑफर दिली होती, पण मी पैसे न घेता पक्षात आलो”

मुंबई | कर्नाटकचे माजी मंत्री श्रीमंत पाटील यांनी एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर कर्नाटकमधील राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. श्रीमंत पटेल यांनी काँग्रेसमधून भाजपत प्रवेश केला होता. त्यावेळी भाजपमध्ये येण्यासाठी पैशांची ऑफर देण्यात आल्याचा खळबळजनक दावा पाटील यांनी केला आहे.

भाजपचे आमदार श्रीमंत बाळासाहेब पाटील यांनी मोठा खुलासा केला आहे. काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी पैसे देऊ केले होते, असं श्रीमंत बाळासाहेब पाटील यांनी म्हटलं आहे.

मी भाजपची पैशांची ऑफर न घेता पक्षात आलोय. मला पैसे नकोय, तर मला केवळ मंत्रीपद पाहिजे होतं. मात्र, मागणी करूनही मला मंत्रीपद देण्यात आलं नाही, असंही श्रीमंत पाटील म्हणाले.

मला माहित नाही की मला सध्याच्या सरकारमध्ये मंत्रीपद का दिले गेले नाही. पण पुढील मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रीपद देण्यात येईल, असं आश्वासन मला देण्यात आलंय. यासंदर्भात कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी माझं बोलणं झालंय, असंही चंद्रकांत पाटील म्हणालेत. पाटील यांच्या दाव्यानंतर काँग्रेसने चौकशीची मागणी केली आहे.

थोडक्यात बातम्या- 

रहाटणीतील ‘लेगसी ऑरा’ चा अनोखा पर्यावरणस्नेही गणेशोत्सव!

पुण्यात बिग बास्केट कंपनीला भीषण आग; सर्व साहित्य जळून खाक

राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

“मुंबई हे महिलांसाठी जगातील अत्यंत सुरक्षित शहर आहे”

“उद्धव ठाकरेंना शिवसेनेच्या इज्जतीचा लिलाव करण्याची हौस आहे”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More