श्रीपाद छिंदमची भाजप आणि उपमहापौर पदावरुन हकालपट्टी

अहमदनगर | छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या श्रीपाद छिंदमकडून उपमहापौरपदाचा राजीनामा घेण्यात आलाय. तसेच त्याची भाजपमधून देखील हकालपट्टी करण्यात आलीय. 

महापालिकेतील एका कर्मचाऱ्यासोबत बोलताना छिंदमने शिवरायांबद्दल अपशब्द वापरले होते. याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर संतप्त जमावाने छिंदमच्या कार्यालयाची तोडफोड केली.

भाजपचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष खासदार दिलीप गांधी यांनी श्रीपाद छिंदम याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. तसेच पक्षातून त्याची हकालपट्टी केल्याची घोषणा केलीय.