शिवरायांबद्दल अपशब्द काढणारा निघाला संघ स्वयंसेवक!

मुंबई | छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द काढणाऱ्या श्रीपाद छिंदमचं भाजपनं निलंबन केलं आहे, मात्र तो संघ स्वयंसेवक निघाला आहे. त्याचे यासंदर्भातले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

श्रीपाद छिंदम अहमदनगरचा उपमहापौर होता. ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर त्याने माफीनामा सादर केला. मात्र भाजपने त्याची पक्षासह उपमहापौरपदावरुन हकालपट्टी केली. 

दरम्यान, श्रीपाद छिंदमचा नवा फोटो समोर आला आहे. ज्यामध्ये तो संघ स्वयंसेवकांसोबत संघाच्या पेहरावात दिसत आहे. त्यामुळे हे संघाचे संस्कार आहेत का? असा सवाल आता विचारला जातोय.