श्रीपाद छिंद्रमला कारागृहातील कैद्यांकडून बेदम मारहाण

अहमदनगर | छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारे भाजपचे नगरचे बडतर्फ उपमहापौर श्रीपाद छिंद्रम यांना कैद्यांनी मारहाण केलीय. सबजेलमध्ये हा प्रकार घडला. 

शिवप्रेमींच्या हातून गैरप्रकार होऊ नये यासाठी पोलिसांनी छिंद्रमला सकाळी लवकरच न्यायालयात हजर केलं. न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. कारागृहात मात्र कैद्यांच्या हातून तो सुटला नाही. 

दरम्यान, छिंद्रमला मारहाण केल्यानंतर कैद्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे सबजेल दणाणून निघालं.