अहमदनगर | छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक भाषा वापरणाऱ्या श्रीपाद छिंदमला ठाकरे सरकारने दणका दिला आहे. श्रीपाद छिंदम याचं नगरसेवकपद रद्द करण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आहे. नगरसेवक पद रद्द केल्यानंतर श्रीपाद छिंदमने प्रतिक्रिया दिली आहे.
आताच मला अहमदनगर महापालिकेकडून आदेशाची प्रत मिळाली. तो आदेश मी वाचला. हा आदेश पाहिल्यानंतर तो योग्य आहे की अयोग्य? हे बोलणं सध्या तरी अयोग्य होईल. मात्र मंत्र्यांसमोर जे कामकाज आलं ते त्यांनी पूर्ण केलं, असं छिंदमने म्हटलं आहे.
सरकारच्या या निर्णयाविरोधात विरोधात याचिका दाखल करायची की नाही याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही. या निर्णयाविरोधात माझा कोणावरही द्वेष नाही, असं श्रीपाद छिंदमने म्हटलं आहे.
दरम्यान, महापुरूषांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी श्रीपाद छिंदमवर कारवाई करण्यात आली आहे. तत्कालीन महापालिकेतील सभागृहाने छिंदमचं पद रद्द झालं पाहिजे, यासाठी ठराव केला होता. त्याबाबतची सुनावणी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रालयातील दालनात झाली.
ट्रेंडिंग बातम्या-
राज्यसभेसाठी भाजपकडून ‘या’ नावावर शिक्कामोर्तब!
40 दिवसांत एका एकरातून शेतकऱ्यानं कमवले 3 लाख 60 हजार रुपये!
महत्वाच्या बातम्या-
सर्वसामान्यांप्रमाणे मंत्री बच्चू कडूंनी केला लोकलनं प्रवास!
उस्मानाबादमध्ये द्राक्ष बागा उद्ध्वस्त करणाऱ्या टोळीचा हैदोस!
कोरोना व्हायरसमुळे शेअर बाजार गडगडला; दिवसभरात साडेपाच लाख कोटी बुडाले
Comments are closed.