बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शासन व समाज मुर्दाड बनलेत, पोलीस कधी नव्हे एवढे लाचार अन् लबाड झालेत”

पुणे | पूजा चव्हाण प्रकरणात राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु असताना आतापर्यंत लेखक, कवी तसेच विचारवंत मात्र या प्रकरणापासून दूर राहिले होते. महाराष्ट्रातील एका मुलीचा अत्यंत दुर्दैवी अंत होतो, एका कॅबिनेट मंत्र्याचं नाव या प्रकरणात येतं, त्यासंदर्भात अनेक ॲाडिओ क्लिप्स आणि फोटो बाहेर येतात.

पोलीस तपास या प्रकरणात योग्य दिशेनं होताना दिसत नाही. अशा परिस्थितीत विचारवंतांच्या वर्तुळात मात्र शुकशुकाट दिसत होता. अखेर मराठी साहित्य संमेलनाचे माजी संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी ही कोंडी फोडून पहिली प्रतिक्रिया उमटवली आहे. एका वर्तमानपत्रासाठी लिहिलेल्या लेखात त्यांनी महाविकास आघाडी सरकारचे अक्षरश: वाभाढे काढले आहेत.

मुलीच्या प्राणापेक्षा सत्तेचे सिंहासन श्रेष्ठ कसे आणि का करावे? देवी जगदंबा आणि संतपुरुष अन्याय अत्याचाराचे समर्थन कसे करू शकतात? सरकारची प्रतिमा मातीमोल होताना शासनाचे कारभारी स्थितप्रज्ञ कसे? स्त्री सन्मानाचा शिवशाहीचा ध्येयवाद वाऱ्यावर का सोडला जातोय? तसेच राजीनामा घेऊन निखळ चौकशी का होत नाही? अशा प्रश्नांचा भडिमार श्रीपाल सबनीस यांनी आपल्या लेखामधून ठाकरे सरकारवर केला आहे.

झालेला प्रकार लोकशाहीला घातक असून स्त्रियांची असुरक्षितता वाढीस लागली आहे. बळी ठरलेल्या मुलीच्या आई-वडिलांचा तोंड बंद करायला सोपा असला तरी न्याय सूत्रांचा कोंडमारा समाजाला परवडत नसतो अशा प्रकारची गंभीर टीका त्यांनी केली आहे. याबरोबरच पारधी समाजाच्या स्त्रीची प्रतिष्ठा आणि पावित्र्य सिद्ध करण्यासाठी झालेल्या परीक्षेबद्दलही त्यांनी सरकारची चांगलीच कानउघडणी केली आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाबद्दल बोलत असताना शासन आणि समाज मुर्दाड बनलेत अशा शब्दात त्यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे तसेच पोलिस यंत्रणा कधी नव्हे तेवढी लाचार आणि लबाड झाल्याचं चित्र दिसून येत असल्याचंही त्यांनी लिहिलं आहे.

चित्रा वाघ यांचा उल्लेख वाघीण असा करत त्यांचा अपवाद वगळता संपूर्ण समाज या मुलीच्या मारेकरी वर्गात सामील झाल्याचा संशय येत असल्याचं सबनीस बोलले आहे. ठाकरे आणि पवार यांच्या नेतृत्वावर बोलत असताना महाराष्ट्र संस्कृतीची नैतिकता सांभाळण्याची जबाबदारी ही त्यांच्यावर असून आजवर कमावलेली पुण्याई सत्तेच्या नादात संपू नये तसेच सत्तेचा स्वार्थ त्याच्या वनवासाला कारण ठरू नये अशा साहित्यिक भाषेत त्यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.

आधुनिक काळातील सीतेची परीक्षा अद्याप संपत नाही. उकळत्या पाण्यात किंवा तेलात हात घालून एका पारधी समाजाच्या महिलेला आपल्या चारित्र्याची परीक्षा देणं अत्यंत दुर्दैवी आणि अघोरी असल्याचं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं आहे. शेवटी ते लिहतात की, समाजात सत्याचे जागरण आणि विवेकाचे प्रबोधन सतत व्हावे! कारण, सत्याच्या गर्भपातावरील सत्तेचे सिंहासन शापित असते.

थोडक्यात बातम्या-

“मृत्यूनंतर माझ्या अस्थी बिअरमधून पबबाहेरील नाल्यात विसर्जित करा”

संजय राठोड प्रकरणी मुख्यमंत्री मोठा निर्णय घेणार?; संजय राऊतांच्या ‘त्या’ ट्विटमुळे चर्चांना उधाण

गळ्यावर धारदार शस्त्राने हल्ला करुन नंतर दगडाने ठेचलं; पुण्यात पीएचडीच्या विद्यार्थ्याच्या हत्येने खळबळ

“नटाचा मृत्यू झाल्यावर खळबळ माजते पण सात वेळा खासदार झालेला माणूस जातो तेव्हा सगळे शांत”

लैंगिक शक्ती वाढवण्यासाठी कायपण… ‘या’ भागात सुरु आहे अत्यंत धक्कादायक प्रकार

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More