कोल्हापूर महाराष्ट्र

पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे याचं निधन; वयाच्या 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

कोल्हापूर | भारताचे पहिले हिंदकेसरी पैलवान श्रीपती खंचनाळे यांचं कोल्हापुरात निधन झालं. खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 86 वर्षांचे होते.

खंचनाळे यांनी महाराष्ट्र केसरी, ऑल इंडिया चॅम्पियनसारख्या अनेक स्पर्धा जिंकल्या होत्या. हिंदकेसरी जिंकत कुस्ती क्षेत्रातील मानाचा पुरस्कार मिळवत महाराष्ट्राची मान त्यांनी उंचावली होती.

खंचनाळे यांचं राज्यातील अनेक मल्ल घडवण्यात मोठं योगदान आहे. त्यांच्या निधनाने कुस्ती क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. खंचनाळे यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

कुस्ती ही लढवय्या महाराष्ट्राची शान आहे. मातीतल्या या खेळावर महाराष्ट्राचे नाव कोरले ते पहिला हिंदकेसरी किताब पटकावून श्रीपती खंचनाळे यांनी. त्यांच्या निधनामुळे अनेक हिंदकेसरींचे आणि होतकरु कुस्तीगीर पैलवानांचे वस्ताद म्हणजे मार्गदर्शक छत्र हरपले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदकेसरी ज्येष्ठ कुस्तीपटू श्रीपती खंचनाळे यांना श्रद्धांजली वाहिली.

थोडक्यात बातम्या-

“मोदी सरकारचे धोरण नको तिथं बोलायचं आणि हवं तिथं हाताची घडी तोंडावर बोट ठेवायचं”

विश्वासघात करुन सत्तेत आलेल्या ठाकरे सरकारची दादागिरी चालू देणार नाही- गोपीचंद पडळकर

‘ठाकरे सरकारचा सत्यनाश झाला पाहिजे’; निलेश राणेंची जहरी टीका

हिवाळी अधिवेशनावर कोरोनाचं सावट, ‘इतक्या’ जणांना झाली कोरोनाची लागण

आज पासून विधिमंडळाच्या अधिवेशनाला सुरुवात, आज ठाकरे सरकार 6 अध्यादेश आणणार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या