महाराष्ट्र यवतमाळ

कुलर ठरला जीवघेणा; तीन लहानग्या बहिणींनी जाग्यावरच सोडला जीव!

यवतमाळ | कुलरचा शाॅक लागून तीन लहान बहिणींचा जाग्यावरच मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राळेगाव तालुक्यातील श्रीरामपूर भागात हा ह्रदय पिळवटून टाकणारा प्रकार घडला आहे.

प्राप्त माहितीनुसार, तालुक्यातील श्रीरामपूर येथे भुसेवार कुटूंबीय वास्तव्यास होतं. या कुटूंबातील दाम्पत्यास तीन मुली होत्या. तिन्ही बहिणी गुरूवारी सकाळी घरीच जेवण करीत बसल्या होत्या. यापैकी एक बहिण उकडायला लागलं, म्हणून कुलरचं बटण सुरू करायला गेली. मात्र तिथेच ती शाॅक लागून अडकून बसली.

आपल्या बहिणीला वाचवायला दुसरी बहिण धावली. मात्र तिलाही जोराचा शाॅक बसला. नक्की काय घडलंय हे समजलं नसल्यानं लहानगी बहिण त्यांच्या जवळ गेली. या चिमुरडीलाही शाॅकचा धक्का बसला. यामध्ये तिन्ही बहिणींचा जागीच मृत्यू झाला आहे.

दरम्यान, मुलींचे आई-वडील शेतात गेल्यानं त्यांना या घटनेची माहिती लागली नाही. घरात कोणीही नसल्यामुळे तिन्ही बहिणींचे मृतदेह घरातच पडून होते. रिया गजानन भुसेवार (वय 6), मोनिका गजानन भुसेवार (वय 4) आणि मोंटी गजानन भुसेवार (वय 2)अशी मृत झालेल्या बहिणींची नावं आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

अंकिता लोखंडेचा सुशांतच्या आत्महत्या प्रकरणी सर्वात मोठा खुलासा; रियाबाबत सुशांत म्हणाला होता की…

….नाहीतर शिक्षण मंत्रालयाचे अवजड उद्योग खाते होईल, शिवसेनेचा टोला

शेतकऱ्यांची गरज लक्षात घेता कृषीमंत्र्यांची केंद्र सरकारकडे महाराष्ट्रासाठी विशेष मागणी

सीरम इन्स्टिट्यूटला मोठा धक्का! ऑक्सफोर्ड लसीच्या भारतातील ह्युमन ट्रायलची मागणी टाळली

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या