युवकांच्या महत्त्वाच्या प्रश्नावर सिनेमातून भाष्य, श्रीयुत नॅान महाराष्ट्रीयन प्रेक्षकांच्या भेटीला

Shriyut Non Maharashtrian | वाढती बेरोजगारी आणि त्यात महत्वाच्या परीक्षांमध्ये होणारा गैरप्रकार, पेपरफूटी हे आपल्या देशातील सध्याचे ज्वलंत प्रश्न आहेत. बेरोजगारी वाढत चालली आहे. त्यामुळे अवघ्या दहा-वीस जागांसाठी देखील हजारो अर्ज केले जातात. त्यातच परीक्षामध्ये घोटाळे होतात, कधी पेपर फुटतो. यामुळे मेहनत घेणाऱ्या युवकांच्या प्रवासात मोठे अडथळे ठरत आहेत. त्यातच मराठी व्यक्ती व्यवसायात रिस्क घेऊन उद्योग करण्यापेक्षा नोकरी करण्यामध्ये जास्त समाधान मानत असतो.(Shriyut Non Maharashtrian )

अनेक बेरोजगार मराठी तरूण स्वतःचा छोटा-मोठा व्यावसाय सुरू करण्याचा प्रयत्न न करता नोकरी शोधण्याच्या मागे लागलेले दिसतात. याच संवेदनशील विषयावर भाष्य करणारा ‘श्रीयुत नॉन महाराष्ट्रीयन’ हा मराठी चित्रपट यंदाच्या गणेशोत्सवात प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

उत्तेजना स्टूडिओज प्रा. लि. निर्मित ‘श्रीयुत नॉन महाराष्ट्रीयन’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल मिडियावर प्रदर्शित झाला आहे. यामध्ये जनक सिंह आणि समीर रंधवे हे दोघे झुंजारू उद्योजक त्यांच्या कॅफेच्या शाखा विस्तारण्यासाठी एका गुंतवणूकदाराच्या शोधात असल्याचे दिसते.

नोकर भरतीतील भ्रष्टाचारावर भाष्य करणारा सस्पेन्स थ्रीलर

जनकच्या सभ्य व्यक्तिमत्वामध्ये आणखी एक पैलू दडलेला आहे, तो रात्रीच्या अंधारात ए. के. नावाच्या गुन्हेगाराचा शोध घेत आहे. त्याला पकडायला जनक सिंह कुठल्याही थरापर्यंत जाण्यास तयार आहे. तर कोण आहे हा ए.के? आणि जनक त्याला का शोधतोय? तसेच त्यांचा काय संबंध आहे? हे जाणून घेण्याची उत्कंठा मराठी प्रेक्षकांना आता लागल्याचे दिसते.

या चित्रपटाचे दिग्दर्शक अजिंक्य उपासनी म्हणाले की, “आम्ही मराठी माणसांसाठी एका संवेदनशील मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे. मराठी माणसे दिवाळी, ख्रिसमस अशा वेळेस हिंदी किंवा अन्य चित्रपट बघत असतात. यंदा आम्ही खास मराठी प्रेक्षकांसाठी गणेशोत्सवात संवेदनशील मराठी चित्रपट घेऊन येत आहोत. मराठी माणसांची टिपिकल प्रतिमा बदलणारा आणि मराठी युवकांना प्रेरणा देणार हा चित्रपट ठरेल अशी अपेक्षा आहे.” (Shriyut Non Maharashtrian )

‘या’ दिवशी रिलीज होणार ‘श्रीयुत नॉन महाराष्ट्रीयन’

दरम्यान, ‘श्रीयुत नॉन महाराष्ट्रीयन’ या चित्रपटाची निर्मिती डॉ. पार्थसारथी आणि सौ. प्रेरणा उपासनी यांनी केली आहे. यात अभिनेता गौरव उपासनी, अथर्व देशपांडे, वैभव रंधवे, सायली वैद्य, संपदा गायकवाड, सर्वेश जोशी आदी कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन, छायांकन, संकलन, पटकथा अशी तिहेरी जबाबदारी अजिंक्य उपासनी यांनी घेतली. (Shriyut Non Maharashtrian )

चित्रपटाची कथा गौरव उपासनी यांची असून या चित्रपटासाठी संवाद लेखनही त्यांनी केले आहे. तर या चित्रपटाला संगीत व पार्श्वसंगीत सुमेध मिरजी यांनी दिले आहे. नोकर भरतीतील भ्रष्टाचारावर भाष्य करणारा ‘श्रीयुत नॉन महाराष्ट्रीयन’ हा मराठी चित्रपट येत्या 6 सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

News Title –  Shriyut Non Maharashtrian release on September 6

महत्त्वाच्या बातम्या-

आज गोकुळाष्टमी! कृष्णाच्या कृपेने ‘या’ 5 राशीचं नशीब उजळणार

मलायका अरोराच्या लेकाचा सावत्र आईसोबतचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

पुण्याच्या राजकारणातील मोठी बातमी; ‘या’ आमदाराने वाढवलं अजित पवारांचं टेंशन

गोरंपान दिसणं झालं सोपं, ‘हे’ 5 नैसर्गिक उपाय आत्ताच ट्राय करा!

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारने केली मोठी घोषणा