बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘हा कठीण काळ आहे’; मालदीवमध्ये एन्जॉय करणाऱ्या सेलिब्रिटींवर श्रुती हासन भडकली

मुंबई | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात अनेक कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. यादरम्यान अनेक सेलिब्रिटी मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गेले आहेत. मात्र या सेलिब्रिटींवर बाॅलिवूड अभिनेत्री श्रूती हसनने संताप व्यक्त केला आहे.

सुट्टी शानदार होती, हे ऐकून आनंद वाटतो. सुट्टी एन्जॉय करणे हा त्यांचा हक्क आहे. पण व्यक्तिश: माझे मत विचाराल तर मास्क काढून पूलमध्ये उतरण्याची ही वेळ नाही. हा कठीण काळ आहे, असं श्रूती हासनने म्हटलं आहे. ‘द क्विंट’ला दिलेल्या मुलाखतीत ती बोलत होती.

काही लोकांसाठी तर खूपच कठीण. सगळं काही सहज मिळतंय, या प्रीव्हिलेजसाठी आभार व्यक्त करणे गरजेचे आहे. पण हे प्रीव्हिलेज अशाप्रकारे लोकांच्या तोंडावर मारणे योग्य नाही. दिखावा करण्याची गरज नाही, असं म्हणत श्रुती हासनने सेलिब्रिटींना सुनावलं आहे. कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर माझे काही मित्र सुट्टीचे प्लानिंग करत होते. मात्र मी त्यांना नकार दिला. इतकेच नाही तर त्यांनाही सुट्टीवर जाण्यास मनाई केली, असंही श्रुतीने यावेळी सांगितलं आहे.

दरम्यान, सध्या बॉलिवूडचे अनेक स्टार्स मालदीवमध्ये आहेत. रणबीर कपूर, आलिया भट, दिशा पाटनी, टायगर श्रॉफ, सारा अली खान हे सगळे सुट्टी एन्जॉय करत आहेत.

थोडक्यात बातम्या-

“अजित पवारांनी झोप कमी करून पुण्याकडं लक्ष द्यावं, अन् झेपत नसेल तर…”

गजा मारणे प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; माजी खासदार संजय काकडेंना अटक

“सरकारी तिजोरीतून वडिलांचे स्मारक बांधणाऱ्या मुख्यमंत्र्यांना अमोल कोल्हे यांनी ज्ञानामृत पाजावं”

धक्कादायक! नाशिकमध्ये चक्कर येऊन एकाच दिवशी 11 जणांचा मृत्यू

तिसरं मुल जन्माला घालणाऱ्यांना तुरुंगात पाठवा- कंगणा रणावत

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More