बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

श्रुती मराठेचा ‘पुण्याची मैना’ व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल, पाहा व्हिडीओ

मुंबई | सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात एका गाण्यावर व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. ते गाणं म्हणजे ‘पुण्याची मैना’. अनेक मुलींनी यावर डान्स केला तर काहींनी काही वेगळं, अशातच मराठी सिनेअभिनेत्री श्रुती मराठेने देखील या गाण्यावर एक व्हिडीओ बनवला आहे. तिचा व्हिडीओ पाहून सर्वच चाहते तिच्यावर फिदा झाले आहेत.

पुण्याची मैना या गाण्यावर व्हिडीओ शेअर करत असताना श्रुतीने पुण्याची मैना! गालावर नाही पण हनुवटीवर पडते खळी, असं लिहलं आहे. श्रुतीचा हा व्हिडीओ पाहून चाहते घायाळ झाले आहेत. या व्हिडीओवर चाहते कमेंट करत आहेत. तिच्या या व्हिडीओवर अभिनेत्री हेमांगी कवीने देखील कमेंट केली आहे. नाय नाय आता तू पवईची मैना! सुंदर तर तू आहेसच गं, पण कमाल गोडुली दिसतेस, असं हेमांगीने लिहिलं आहे.

श्रुतीने मराठीसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही चाहत्यांची मनं जिंकली आहेत. तामिळ सिनेमा ‘इंदिरा विजहा’ने मधून तिने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. श्रुतीने अभिनेता गौरव घाटणेकरसोबत लग्न केलं आहे. तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. गौरव घाटणेकर मराठी टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीतील एक नावाजलेलं नाव आहे.

दरम्यान, श्रुतीने तामीळमधील ‘प्रेम सूत्र’, तर मराठीत ‘सनई चौघडे’ सारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. श्रुतीने विविध मराठी, तामिळ चित्रपटात काम केले आहे. साउथमध्ये ती ‘श्रुती प्रकाश’ या नावाने प्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या अंदाजातील श्रुतीच्या फोटोंना रसिकांनी कायमच पसंतीची पावती दिली आहे.

पाहा व्हिडीओ-

 

View this post on Instagram

 

A post shared by Shrutii Marrathe (@shrumarathe)

थोडक्यात बातम्या-

फडणवीसांच्या ‘त्या’ निर्णयाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा नकार

‘या’ शहरात म्यूकरमायकोसिसचा कहर सुरूच; आतापर्यंत तब्बल 100 जणांचा मृत्यू

मुंबईत विनामास्क फिरणाऱ्यांकडून एका दिवसात तब्बल एवढ्या लाखांचा दंड वसूल

“मी सुपारीचोर आहे तर, निलेश राणेंच्या वडिलांची हऱ्या-नाऱ्याची गॅंग होती”

मुंबईत दररोज हजारांच्या आत नव्या कोरोनाबाधितांची होतेय नोंद, कोरोनामुक्तीचा दर वाढला

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More