
धुळे | तेलगीचे साथीदार आणि चार वर्षे तुरुंगात असताना तुम्हाला भाजपने तिकीट दिले. तसेच तुम्हाला ‘पवित्र’ करुन निवडून आणलं, असं प्रत्त्युतर संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यानी भाजपचे आमदार अनिल गोटेंना दिलं आहे.
अनिल गोटे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांवर जोरदार टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार अनिल गोटे यांना प्रत्युत्तर दिले आहे.
गोटेंची लढाई निष्ठावतांसाठी नाही तर स्वतःला महापौरपदी विराजमान होण्यासाठीची आहे. ते शांत राहिले असते तर धुळ्याचे प्रभारी तथा जलसंपदामंत्री गिरीष महाजन ‘त्यांच्या’ घरीही गेले असते, असंही ते म्हणाले.
दरम्यान, भाजपात जातीयवाद नाही. मराठा आहे म्हणून पक्षाने तिकिट दिले नाही. धुळ्याच्या विकासासाठी मला संधी देण्यात आली, असंही त्यांनी सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या-
-तृप्ती देसाई यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी!
-1 जानेवारीपासून पुण्यात हेल्मेटसक्ती!
-फक्त ‘भारतमाता की जय’ बोलणे म्हणजे राष्ट्रप्रेम नाही!
-दीपिका आणि रणवीरच्या लग्नाला शुभेच्छा देण्यासाठी मला वेळ नाही!
-तुम्ही भांडत बसा, समृद्धी महामार्गाचं नावही आम्हीच ठेऊ!