बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नरेंद्र मोदी स्टेडिअमवर पहिल्याच दिवशी मोठा वाद, ‘या’ कारणामुळे भडकले इंग्रज!

अहमदाबाद | आजच नाव बदललेल्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर पहिल्याच दिवशी झालेल्या भारत आणि इंग्लंड कसोटी सामन्यात मोठा राडा पहायला मिळाला. सामन्याच्या पहिल्याच दिवशी इंग्लंडच्या खेळाडूंनी अंपायरच्या एका निर्णयावर उघड उघड नाराजी दाखवली. भारताचा सलामीवीर शुभमान गिलला नॉट आउट दिल्यावर या सामन्यात मोठा वाद झाला.

इंग्लंडची खेळी 112 धावांवर संपुष्टात आल्यानंतर भारताचे फलंदाज लगेचच खेळायला आले. डावाला सुरुवात झाल्यानंतर दुसऱ्याच षटकात गिल नॉटआउट असल्यावरून वादावादी झाली. त्याआधी अक्षर पटेल आणि अश्विनच्या फिरकीने तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या खेळाडूंची दाणादाण उडाली.

अक्षर पटेलच्या घातक माऱ्यापुढे इंग्लिश खेळाडूंनी नांग्या टाकल्या आणि त्यांची खेळी 112 धावांवर संपुष्टात आली. भारताची सलामीची जोडी रोहित शर्मा आणि शुभमन गिल त्यानंतर फलंदाजीसाठी उतरले. भारतीय डावाच्या दुसऱ्याच षटकात स्टुअर्ट ब्रॉडच्या चेंडूवर गिलच्या बॅटची किनार लागून स्लिपमध्ये उभ्या असलेल्या बेन स्टोक्सकडे चेंडू गेला. स्टोक्सने झेल घेतल्याचा दावा केला, पण मैदानावरचे पंच अनिल चौधरी यांनी गिल आऊट असल्याचा संकेत देत तिसऱ्या अंपायरवर निर्णय सोपवला.

थर्ड अंपायर शम्सुद्दीन यांनी केवळ दोन वेला रिप्ले पाहून शुभमन गिलला नॉटआउट असल्याचं जाहीर केलं. बेन स्टोक्ससह इंग्लंडच्या इतर खेळाडूंना या निर्णयाचा मोठा धक्का बसल्याचं दिसून आलं. त्यांनी मैदानावरच याबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली. बेन स्टोक्सने तर चक्क टाळ्या वाजवून पंचांच्या या निर्णयाची खिल्ली उडवली. दुसरीकडे इंग्लंडचा कर्णधार जो रूटसह इतर खेळाडू पंचांसोबत हुज्जत घालू लागले.

इंग्लंडचे खेळाडू पंचांच्या निर्णयाविरोधात आक्रमक झालेले दिसले.  कॉमेंट्री बॉक्समध्ये बसलेल्या दिग्गज खेळाडूंनीही थर्ड अंपायरने आणखी काही वेळा रिप्ले बघायला हवा होता, असं मत व्यक्त केलं. खरं तर सुनील गावस्कर यांनी रिप्ले बघून लगेच सांगितलं होतं की, शुभमन नॉट आउट आहे यात काही शंका नाही. मात्र या वादाची आता चांगलीच चर्चा सुरु आहे.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

“सत्तेत आल्यानंतर हिटलरने देखील मोठं स्टेडियम बांधून स्वतःचं नाव दिलं होतं”

“या कारणामुळेच ‘RSS’च्या चेल्यांनी सरदार पटेलांचं नाव बदललं”

नॅशनल क्रश रश्मिका मंधना लवकरच बॉलिवूडमध्ये, उचललं हे मोठं पाऊल

उत्तर द्या ठाकरे सरकार!; पूजा चव्हाण प्रकरणात भाजपनं विचारले ‘हे’ 14 प्रश्न

शेतकरी तसेच सर्वसामान्यांना मोठा दिलासा; ऊर्जामंत्र्यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More