सारा नाही तर ‘या’ अभिनेत्रीशी करणार शुभमन गिल लग्न?, चर्चेला उधाण

Shubman Gill & Ridhima Pandit | क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर आणि टीम इंडियाचा खेळाडू शुभमन गिल यांचं एकमेकांसोबत नाव जोडलं गेलं आहे. क्रिकेटचे चाहते शुभमन गिलला साराच्या नावाने चिडवत होते. त्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अशातच आता शुभमन गिलचं सारानंतर आता एका अभिनेत्रीसोबत नाव जोडण्यात आलं आहे. त्या अभिनेत्रीचं नाव हे रिद्धीमा पंडीत असं आहे. (Shubman Gill & Ridhima Pandit)

रिद्धीमा पंडीत ही तिच्या खासगी आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत आली आहे. तिचे नाव हे आता एका टीम इंडियाचा फलंदाज आणि हँडसम बॉय शुभमन गिलसोबत जोडलं गेलं आहे. शुभमन आणि रिद्धीमा (Shubman Gill & Ridhima Pandit) हे दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. रिद्धीमा पंडीतचं नाव हे शुभमन गिल (Shubman Gill & Ridhima Pandit) सोबत जोडलं गेलं आहे. यावर आता रिद्धीमाने भाष्य केलं आहे. त्याची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

शुभमन गिलसोबतच्या नात्यावर रिद्धीमाने केलं भाष्य

रिद्धीमा आणि शुभमन गिलच्या (Shubman Gill & Ridhima Pandit) नातेसंबंधांवरील चर्चांवर आता स्वत: रिद्धीमाने भाष्य केलं आहे. शुभमन गिलला मी ओळखत नाही आणि शुभमन गिल मला ओळखत नसल्याचं भाष्य आता स्वत: रिद्धीमाने केलं आहे. हा एक फक्त स्टंट अशल्याचं रिद्धीमा म्हणाली आहे. मी यावर काय बोलू? या अशाच काहीतरी गोष्टी सुरू असल्याचं रिद्धीमा म्हणाली आहे. जर अशा रिलेशनच्या गोष्टींमध्ये मला पडायचं असतं तर मी बिग बॉसच्या घरातच पडले असते असं रिद्धीमा म्हणाली आहे.

जर मी हे सर्व काही केलं असतं तर मी शोमध्ये अद्यापही टिकले असते. प्रसिद्धीसाठी असं काही करायला आवडत नाही. मी खूप जास्त मेहनतीने इथपर्यंत पोहोचली आणि मी माझ्या कामासाठी ओळखत असल्याचं रिद्धीमा म्हणाली. मी कोधीच कोणत्याही रिलेशनशिपमुळे ओळखली जावी असं मला वाटत नसल्याचं रिद्धीमा म्हणाली आहे.

रिद्धीमाकडून शुभमन गिलचं कौतुक

त्यानंतर रिद्धीमाने शुभमन गिलचं कौतुक केलं आहे. ती म्हणली की, शुभमन गिल हा मोठा क्रिकेटर आहे. नशीब माझं नाव हे चांगल्या क्रिकेटरसोबत जोडलं गेलं आहे. माझ्या मनात त्याच्याबाबत खूप आदर आहे. माझे नाव हे 75 वर्षाच्या व्यक्तीसोबत जोडले गेले असते तरीही लोकांना हे खरे वाटले असते, असं रिद्धीमा म्हणाली आहे.

रिद्धीमा पंडीतने स्पष्ट सांगितले आहे की, तिचे आणि शुभमन गिलचे काहीच सुरू नाहीये. मात्र, असे असताना देखील काही दिवसांपासून सतत यांच्या नावाची चर्चा आहे.

News Title – Shubman Gill & Ridhima Pandit Relationship

महत्त्वाच्या बातम्या

प्री-वेडिंगवरच हजार कोटी उडवले, लग्नासाठी तर तब्बल..; अंबानींच्या लग्नातील खर्चाचा आकडा समोर

विधानपरिषद निवडणुकीच्या तोंडावर गणपत गायकवाड तुरूंगाबाहेर येणार?

अजित पवार गटातील नेत्याकडून अनिल परब यांचं कौतुक!

आठवड्याच्या शेवटी सोनं महागलं; 10 ग्रॅमसाठी आता..

देशात ‘या’ चारचाकी वाहनांची खरेदी करण्यासाठी मिळणार सवलत!