Shubman Gill l गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री अनन्या पांडे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत आहे. तसेच अनन्या सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय आहे. मात्र यावेळी अनन्या पांडे ही तिच्या चित्रपटांमुळे नाही तर तिच्या पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. कारण अनन्या पांडे ही गेल्या कित्येक वर्षांपासून बॉलिवूड अभिनेता आदित्य रॉय कपूरला डेट करत आहे. मात्र नुकतेच त्यांचे ब्रेकअप झाल्याची माहिती आहे. मात्र अद्याप या दोघांनीही ब्रेकअपवर भाष्य केलं नाही.
अनन्याचे ‘या’ क्रिकेटरसोबत फोटो व्हायरल :
अशातच अभिनेत्री अनन्या पांडे अनंत अंबानीच्या लग्नात हार्दिक पांड्यासोबत धमाल करताना दिसले होते. मात्र हार्दिक पांड्याचा अगदी काही दिवसांपूर्वीच त्याच्या पत्नीसोबत घटस्फोट झाला आहे. त्यामुळे अनन्या पांडे आणि हार्दिक पांड्या यांच्या अफेअरच्या चर्चा असतानाच आता दुसरीकडे अनन्या पांडे ही क्रिकेटर शुभमन गिलसोबत फोटोमध्ये दिसली आहे.
शुभमन गिल आणि अनन्या पांडे यांचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहेत. फोटोमध्ये दोघेही जबरदस्त अशा लूकमध्ये दिसत आहेत. अनन्या पांडे आणि शुभमन गिल यांचे हे फोटो व्हायरल झाल्याने चाहते तर्क वितर्क लावत आहेत.
Shubman Gill l शुभमन गिल नक्की प्रेम कोणावर करतो? :
अभिनेत्री अनन्या पांडे आणि क्रिकेटर शुभमन गिल यांनी एका जाहिरातीमध्ये एकत्र काम केले आहे आणि व्हायरल होणारे फोटो तेच असल्याचे समजत आहे. अगोदरच क्रिकेटर शुभमन गिल याचे नाव सारा अली खान हिच्यासोबत जोडले जात असतानाच आता अनन्या पांडे सोबतचे फोटो व्हायरल होत आहेत. यामुळे सोशल मीडियावर विविध चर्चा रंगण्यास सुरूवात झाली आहे.
अनेक चाहत्यांनी हे फोटो पाहून शुभमन गिल याला धोकेबाज असे देखील म्हटले आहे. एवढेच नव्हे तर एका यूजर्सने म्हटले की, हा शुभमन गिल नक्की प्रेम कोणावर करतो? मात्र आता हे फोटो जाहिरातीचे असल्याची माहिती समोर आली आहे.
News Title : Shubman Gill Viral Photo
महत्वाच्या बातम्या-
बिग बॉसच्या घरात निक्की तांबोळीचं वादग्रस्त वक्तव्य! होतय प्रचंड व्हायरल
अजित पवारांच्या प्रकृतीत बिघाड, डाॅक्टरांनी दिली महत्त्वाची अपडेट
हरतालिका व्रताच्या दिवशी ‘या’ गोष्टी करा, मिळेल शिव-पार्वतीचा आशीर्वाद!
‘तू वेळ आणि तारीख सांग, मी…’; ‘हा’ भाजप नेता थेट नितेश राणेंना भिडला
गरोदर महिलांनो या महिन्यात आहे चंद्रग्रहण; जाणून घ्या वेळ आणि तारीख