Shubman Gill & Sara Tendulkar l भारतीय क्रिकेट संघाचा स्टार सलामीवीर शुभमन गिल (Shubman Gill) आपल्या शानदार फलंदाजीमुळे चर्चेत असतोच, पण त्याच्या खासगी आयुष्याबाबतही चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता असते. विशेषतः त्याचं नाव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांच्या कन्या सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) हिच्यासोबत जोडले जाते. दोघांचे फोटो अनेकदा व्हायरल झाले आहेत आणि चाहत्यांकडून याबद्दल वारंवार विचारणा होते. मात्र, यावर शुभमन आणि साराने कधीच थेट उत्तर दिले नव्हते.
शुभमन गिलचे ‘कदाचित’ उत्तर! :
नुकत्याच व्हायरल झालेल्या एका जुन्या मुलाखतीत शुभमनला थेट विचारण्यात आलं, “तू साराला डेट करतोय का?” यावर शुभमनने एका शब्दात उत्तर देत म्हटलं, “कदाचित…” त्याच्या या उत्तराने चर्चांना पुन्हा एकदा जोर आला आहे. चाहत्यांना आता प्रश्न पडला आहे की, त्याने अप्रत्यक्षरित्या नात्याची कबुली दिली की तो फक्त टाळाटाळ करत होता?
शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर यांच्या अफेअरच्या चर्चा नव्या नाहीत. सारा अनेकदा स्टेडियममध्ये भारताचे सामने पाहताना दिसली आहे. तसेच काही महिन्यांपूर्वी ती शुभमन गिलच्या बहिणीसोबत एकाच कारमध्ये प्रवास करताना दिसली होती. या गोष्टीमुळे दोघांचे नाते अजूनच चर्चेत आले आहे.
Shubman Gill & Sara Tendulkar l शुभमन गिलवर मैदानाबाहेरही लक्ष केंद्रित :
शुभमन गिल सध्या दुबईत भारतीय संघासोबत आहे. इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेनंतर त्याला उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मैदानावर चमकदार कामगिरी करत असतानाच त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही चर्चांना उधाण आले आहे. बांगलादेश आणि पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यांत त्याने प्रभावी खेळी केली होती.
शुभमन आणि साराच्या नात्यावर त्याने स्वतः ‘कदाचित’ असं उत्तर देत आणखी उत्सुकता वाढवली आहे. त्यामुळे हे दोघं खरंच रिलेशनशिपमध्ये आहेत की नाही, याचं उत्तर अजूनही गुलदस्त्यातच आहे!