बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्लांच्या अडचणी वाढणार?, तपास यंत्रणेकडे सबळ पुरावे!

मुंबई | बेकायदेशीरपणे राज्यातील महत्वाच्या व्यक्तींचे फोन टॅप केल्याप्रकरणी वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यासंदर्भात तयार केलेला अहवाल त्यांनी बेकायदेशिरपणे उघड केल्याचा आरोप मुंबई पोलिसांनी त्यांच्यावर केला आहे. रश्मी शुक्लांनी हे आरोप फेटाळले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारुनच हे फोन टॅप केल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

फोन टॅपिंग प्रकरणाचा गोपनीय अहवाल स्वत: रश्मी शुक्ला यांनी बनवला होता आणि सरकारकडे जमा केला होता. तर यातील कागदपत्रे गहाऴ झालीच कशी? असा सवाल राज्य सरकारनं हायकोर्टात उपस्थित केला आहे. हा तपास सीबीआयकडे सुपुर्द करण्यात यावा, अशी याचिका शुक्ला यांनी हायकोर्टाकडे केली आहे. राज्य सरकारनं मात्र तपासयंत्रणेकडे शुक्लांच्या विरोधात सबळ पुरावे असल्याचा दावा करत हायकोर्टात भूमिका मांडली आहे.

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहीनीच्या मुलाखतीमध्ये उल्लेख केलेला 6 जीबीचा पेन ड्राइव्ह विरोधी पक्ष नेत्यांपर्यंत कसा पोहोचला?, तो रश्मी शुक्ला यांच्याकडूनच दिला गेलाय का?, या प्रकरणाची न्यायवैद्यकीय चाचणी व्हावी, त्यांचा ताबा मिळवण्यासाठी दंडाधिकारी कोर्टात अर्ज केल्याचं विशेष सरकारी वकिल दरायस खंबाटा यांनी सांगितलं. मुंबई पोलिसांनी रश्मी शुक्ला यांना अद्याप आरोपी केलं नसल्याचं प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे, अशी माहितीही खंबाटा यांनी हायकोर्टाला दिली.

दरम्यान, रश्मी यांना आरोपी करण्यात येईल तेव्हा त्या कोर्टात याचिका दाखल करू शकतात, असं न्यायालयानं स्पष्ट केलं. जर शुक्ला यांना पोलिसांनी आरोपी केलेलं नसेल आणि करणार नसतील तर याचिकेवर सुनावणी करण्यात वेळ वाया घालवणार नसल्याची स्पष्ट भूमिका न्यायालयानं मांडली आहे.

थोडक्यात बातम्या

महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन अध्यक्षांविना?, महाविकास आघाडीला ‘या’ गोष्टीची भीती

“…तोपर्यंत समीर वानखेडे यांनी राजीनामा द्वावा”

एनसीबीमधील ‘Special-26’चा खुलासा होणार; नवाब मलिक लवकरच करणार नवा गौप्यस्फोट

WANTED! किरण गोसावीच्या अडचणी वाढल्या, पुणे पोलिसांनी उचललं ‘हे’ पाऊल

पुण्यातील ‘हा’ गंभीर मुद्दा गेला थेट नितीन गडकरींच्या दरबारी; महापौर भेटीसाठी जाणार दिल्लीला

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More