Shweta Bachchan | बॉलीवुडचे बीग-बी अर्थात अमिताभ बच्चन यांची लाडकी लेक श्वेता बच्चन सध्या चर्चेत आली आहे. एवढ्या दिवस अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगत होत्या. अशात श्वेता बच्चन चर्चेत आलीये. तिच्या अफेअरबाबत एक मोठा खुलासा झालाय.
श्वेता बच्चन हिचं लग्न उद्योजक निखील नंदा याच्यासोबत झालं आहे. श्वेता कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. आता श्वेता तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आलीये. सध्या हे दोघेही एकत्र राहत नसल्याचं म्हटलं जातं.कामामुळे दोघे वेगळे राहातात.
श्वेता बच्चन होती हृतिक रोशनच्या प्रेमात?
कधी काळी जेव्हा श्वेता मुंबईत शिफ्ट झाली होती, तेव्हा निखील नंदा आणि श्वेता बच्चन एकमेकांपासून वेगळे झाल्याची जोरदार चर्चा झाली. याच काळी तिचं नाव एका अभिनेत्यासोबत देखील जोडलं गेलं होतं.
हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेता हृतिक रोशन होता. सांगायचं झालं तर, श्वेता आणि हृतिक एकमेकांचे चांगले मित्र आहेत. शाळेत देखील दोघे एकत्र होते. जेव्हा हृतिक याच्या पायाला दुखापत झाली होती, तेव्हा श्वेता आणि अभिषेक त्याला भेटायला देखील जायचे.
काही मीडिया रिपोर्टनुसार कुणाल कपूरच्या लग्नानंतर श्वेता (Shweta Bachchan )आणि हृतिक एकमेकांच्या जवळ आल्याचं देखील म्हटलं जातं.
कंगनामुळे श्वेता हृतिकपासून वेगळं झाली?
पुढे हृतिक रोशनच्या आयुष्यात कंगना आली होती. कंगना रनौत आणि हृतिक रोशन यांच्या नात्याच्या चर्चा तुफान रंगू लागल्या तेव्हा श्वेता हिने स्वतः प्रकरणातून लांब राहण्याचा निर्णय घेतला. सध्या हृतिक रोशन देखील सबा आझाद हीला डेट करत आहे. त्याने काही वर्षांपूर्वीच सुझान हिच्याशी घटस्फोट घेतलाय.
सध्या श्वेता बच्चन पती निखिल नंदासोबत वेगळं राहत असली तरी त्यांचं नातं अजूनही कायम असल्याचं म्हटलं जातं. निखिल मुंबईत तिला नेहमी भेटण्यासाठी येत असतो. श्वेता (Shweta Bachchan )मुलगा अगस्त्य आणि मुलगी नव्या सोबत मुंबईत राहते.
News Title – Shweta Bachchan Fall In Love With Hrithik Roshan
महत्त्वाच्या बातम्या-
“धर्मावरून पाकिस्तानला इस्लामिक राष्ट्र बनवलं मग भारताला हिंदू..”; कंगनाचं मोठं वक्तव्य
बजरंग सोनवणेंचा धक्कादायक दावा; बीडमध्ये एकच खळबळ
आहारात प्रोटीन पावडरचा समावेश करताय? तर होऊ शकतात ‘हे’ गंभीर आजार
मतदान करायला घराबाहेर पडण्याअगोदर ही बातमी वाचाच! अन्यथा थांबावा लागेल तासनतास रोडवर उभा