गांधीनगर | डंपरनं आमच्या कारला धडक दिल्यानं, आम्ही हादरलो असलो तरी घाबरलो नाही, असं गुजरातचे माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांच्या पत्नी श्वेता भट्ट यांनी म्हटलं आहे. त्यांनी या घटनेची माहिती फेसबुक पोस्ट लिहून दिली आहे.
श्वेता भट्ट आणि मुलगा शंतनू भट्ट हे कारमधून प्रवास करत असताना मागून आलेल्या डंपरनं ड्राईव्हरच्या साईडला कारला धक्का दिला, आणि तो डंपर वेगात डिव्हायडर पार करुन निघून गेला. कार पलटी झाल्यानं श्वेता भट्ट आणि शंतनु भट्ट जखमी झाले आहेत.
आम्हाला भीती दाखवण्याचा आणि संजीव भट्ट यांचं मानसिक खच्चीकरण करण्याचा हा प्रयत्न असला, तरी आम्ही घाबरणार नाही, असं श्वेता भट्ट यांनी मह्टलं आहे. हा प्रकार 7 जानेवारी रोजी घडला आहे.
दरम्यान, संजीव भट्ट यांनी 2002 च्या गुजरात दंगलीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात गुजरातच्या तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींच्या विरोधात शपथपत्र दाखल केलं होतं.
महत्वाच्या बातम्या-
-…म्हणून विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या आवारात आणलं पुणेरी पगडी घातलेलं गाढव!
-मला घाणेरड्या राजकारणाचा वीट आलाय, लोकसभा निवडणूक लढवणार नाही!
-विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात पुणेरी पगडीची वाद चिघळला, 4 विद्यार्थी ताब्यात
-काँग्रेस मोदींच्या बापाची मालमत्ता नाही, वसंत पुरकेंचं आक्षेपार्ह वक्तव्य
-भाजपच्या 3 माजी मुख्यमंत्र्यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती
Comments are closed.