“ज्या मलिकांनी शिवसेना भवनात बॉम्बस्फोट घडवले त्यांनाच उद्धव ठाकरे वाचवत आहेत”
बुलढाणा | राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) सध्या ईडीच्या अटकेत आहेत. मनी लाॅर्डिंग आणि दाऊद कनेक्शन प्रकरणात त्यांना कोठडी सुनावली आहे. त्यामुळे सध्या राज्यातील वातावरण तापलं आहे. अनेकजण नवाब मलिकांना लक्ष करत आहे. अशातच आता भाजप आमदार श्वेता महाले (Sheta Mahale) यांनी मलिकांवर गंभीर आरोप केला आहे.
ज्या नवाब मलिकांनी मुंबईत बॉम्बस्फोट घडवले. शिवसेना भवनात बॉम्बस्फोट घडवले. त्यांनाच वाचवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुढे आले आहेत. हे दुर्देवी आहे, असं श्वेता महाले यांनी म्हटलं आहे.
शिवसेनेचं हिंदुत्व निघून गेलं आहे. सध्या शिवसेनेचं हिंदुत्व ढोंगीपणाचं आहे, अशी जहरी टीका श्वेता महाले यांनी केली आहे. त्यामुळे आता पुन्हा नवा वादंग उभा राहणार असं पहायला मिळत आहे.
नवाब मलिकांच्या अटकेला जवळपास महिना पूर्ण होत असून भाजपने यावरुन आक्रमक भूमिका घेतला आहे. नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजप वारंवार मागणी करत आहे. तरीही अद्याप मलिकांचा राजीनामा देण्यास ठाकरे सरकारनं नकार दिला आहे.
थोडक्यात बातम्या –
Gold Rate: सोन्याच्या दरात मोठी घसरण, वाचा काय आहेत दर
कोरोनाची चौथी लाट येणार?; तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा
दहावी आणि बारावी पास विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!
पुतिन यांनी 1 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं, धक्कादायक कारण समोर
“आमचे आमदार फुटणार नाहीत, कुणी फुटलाच तर…””
Comments are closed.