बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…त्या महिलांचीच चुकी आहे; मुंडे, शेख, वाघमारे, राठोड अगदी निरागस आहेत”

मुंबई | राज्यात वारंवार होणाऱ्या महिला अत्याचाराच्या घटनांवरून भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. श्वेता महाले यांनी एक खोचक ट्विट करत सरकारवर सडकून टीका केली आहे.

पूजा चव्हाणने आत्महत्या केली, हिरेन मनसुखने आत्महत्या केली, जळगावच्या ‘त्या’ महिलेने गर्मी होत होती म्हणून झगा काढून ठेवला होता. ज्यांच्यावर बलात्कार झालेत त्यात त्या महिलांची चुकी आहे, मुंडे, शेख, वाघमारे, राठोड अगदी निरागस आहेत आणि राज्याला धोका सचिन, लतादीदी, अमिताभ, अक्षयकडून आहे, असं शब्दात महाले यांनी संताप व्यक्त केला आहे.

श्वेता महाले यांनी मनसुख हिरेन मुत्यू प्रकरणावर देखील भाष्य केलं आहे. मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास एनआयएकडे जाईपर्यंत सर्व पुरावे नष्ट होण्याची शक्यता अधिक आहे. मग कुठलीही यंत्रणा लावा फार काही निष्पन्न होणार नाही, असं श्वेता महाले म्हणाल्या. आधीच्या सुशांत व दिशा प्रकरणावरून लक्षात येऊ शकेल. त्यामुळे चार दिवस न्यूज चॅनेलला टीआरपी मिळेल, एवढंच काय यातून निष्पन्न होईल, असंही श्वेता महाले यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, महाले यांच्या या ट्विटची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांच्या या ट्विटवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देत सरकारच्या कारभारावर संताप व्यक्त केला आहे.

 

थोडक्यात बातम्या-

“अशोक चव्हाण ताठर माजी मुख्यमंत्री, गडी ऐकायलाच तयार नाही”

धनंजय महाडिक यांनी सतेज पाटील यांच्यावर केला ‘हा’ गंभीर आरोप

…अन् अशाप्रकारे कुख्यात गुंड गजा मारणे पुन्हा पोलिसांच्या जाळ्यात अडकला!

ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे काळाच्या पडद्याआड; मराठी सिनेसृष्टीवर शोककळा…

पाकिस्तानात हिंदू कुटुंबावर जीवघेणा हल्ला, 5 जणांचा जागीच मृत्यू

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More